नंदोरी (जि. वर्धा) : देशात २०१९ या वर्षात एक लाख ३९ हजार १२३ जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकावरचे राज्य आहे. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने हे भीषण वास्तव समोर आले आहे. गत वर्षात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आत्महत्या हा विषय अधिकच चर्चिला गेला. आत्महत्या करणाऱ्यात गरीब, श्रीमंत, लहान, मोठे, वृद्ध यांचा समावेश पाहता आत्महत्या खरोखरच देशासमोरचे नवे संकट म्हणून समोर येतंय का, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहत आहे.
आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी १३.६ टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. तसेच आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० पट असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. म्हणजे जगात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या होते. यावरून आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे.
आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या १५.४ टक्के आहे. महाराष्ट्रात १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू ८.७ टक्के, पश्चिम बंगाल ९.१ टक्के, मध्यप्रदेश ९ टक्के आणि कर्नाटकात ८.१ टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. या पाच राज्यात मिळून ४९.५ आत्महत्या झाल्या आहेत.
आर्थिक मिळकतीनुसार आत्महत्या
एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ९२ हजार ०८३ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. एक लाख ते पाच लाख आर्थिक उत्पन्न असलेल्या देशातील ४१ हजार १९७ जणांनी आत्महत्या केली आहे.
देशातल्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरात म्हणजेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांमध्ये ३६.६ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.
देशात ९२ हजार ७५७ म्हणजे ६६.७ टक्के विवाहितांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ३२ हजार ८५२ म्हणजेच २३.६ टक्के अविवाहितांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्येची प्रमुख कारणे आणि टक्केवारी
कारण टक्केवारी
कौटुंबिक, वैवाहिक वाद ३७.९ टक्के
आजारपण १७.१ टक्के
व्यसनाधीनता ५.६ टक्के
प्रेमभंग ४.५ टक्के
कर्जबाजारीपणा ४.२ टक्के
आत्महत्येचे वय
१८ पेक्षा कमी वर्षे वय- ९६१२ म्हणजेच ६.९ टक्के
१८ ते ३० वय- ४७ हजार ७७४ म्हणजे ३५.१ टक्के
३० ते ४५ वयोगटात ४४ हजार २८७ म्हणजे ३१.८ टक्के
भारतातील २०१५-२०१९ दरम्यानच्या आत्महत्या
वर्ष एकूण आत्महत्या
२०१५ १,३३,६२३
२०१६ १,३१,००८
२०१७ १,२९,८८७
२०१८ १,३४,५१६
२०१९ १,३९,१२३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.