नागपूर : महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आधीपासूनच आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ही सोय नव्हती. आता ५२ ठिकाणी ही सोय उपलब्ध झाली असून ५,२०० विद्यार्थ्यांचा प्रवेश तिथे निश्चित झाला असल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. आजवर आर्थिक परिस्थितीमुळे बड्या शहरांमध्ये शिक्षण घेऊ न शकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना विविध शहरांमधील या वसतिगृहाचा मोठा आधार मिळाला आहे.