बुलडाणा : दिवाळीच्या प्रकाशपर्वात नागरिकांच्या घरासोबत त्यांचे आयुष्य देखील प्रकाशमान व्हावे यासाठी महावितरणतर्फ़े राबविण्यात आलेल्या ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ या संकल्पने अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार २१४ ग्राहकांना नवीन वीज जोडणी मिळाली.यामुळे त्यांचे दिवाळी प्रकाशमय झाली आहे. यात सर्वाधिक ४० वीज जोडण्या खामगाव विभागात देण्यात आल्या.