Accident News : सुरजागड लोहखनिज प्रकल्पात मोठी दुर्घटना; ट्रक महिंद्रा कॅम्परवर आदळल्याने अभियंत्यासहीत तिघांचा जागीच मृत्यू

पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळल्याने तिघांचा मृत्यू झाला
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात काल (रविवारी 6 ऑगस्ट) संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर जोरदार कोसळला. त्यामुळे या महिंद्रा कॅम्परमधील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या तिघांपैकी एक जण इंजिनीअर आहे.

तर दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सुरजागडमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

मृतकांमध्ये सोनल रामगीरवार (वय 26, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Accident News
Sakal Impact : ‘त्या’ पुरातन धोकादायक भिंतीचा वरचा भाग काढला; ‘सकाळ’चा दणका

सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर कोसळलं. त्यामध्ये अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Accident News
Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर कंटेनर खाली चिरडून एकजण जागीच ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()