नांदुरा : १५ मलकापूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सरळ सामना संगणार असून या वेळी मात्र दोन्ही पक्षातील अंतर्गत कलहा मुळे यावेळी बंडखोरीची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून उमेदवारांच्या घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून उमेदवारांच्या घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तसा पारंपारिक भाजपाचा पूर्वीपासून बालेकिल्ला होता, मात्र २०१९ च्या विधानसभा निवडनुकीच्या कॉँग्रेससने यात बाजी मारून राजेश एकडे यांनी भाजपाच्या या गडाला सुरुंग लावत विधानसभेत प्रवेश केला होता.
आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा व कांग्रेस मा दोन्ही पक्षांना अंतर्गत कलहाने तंग करून सोडले आहे. विद्यमान आमदार म्हणून राजेश एकडे यांची उमेदवारी ही पक्की मानली जात असली तरी कॉँग्रेससचे हरीश रावळ, रशीदखा जमादार, डॉ. अरविंद कोलते, पदमराव पाटील यांनी देखील उमेवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे कांग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत स्पष्ट व्हायला लागले आहेत.
तीच परिस्थिती भाजपाची या मतदारसंघात आहे. भाजपाचे चैनसुख संचेती पुन्हा दंड थोपटून कामाला लागले असून दुसरीकडे याच पक्षाचे शिवचंद्र तायडे यांनी उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीनिशी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. मागील कृषी उत्पन बाजार समितीच्या सभापतीच्या प्रकरणावरून राजकीय कलगितुरा येथे चांगलाच गाजला आहे.
त्यामुळे एकमेकांच्या विरोधात कुणालाही उमेदवारी भेटती म्हणजे दोन गटात भाजपची विभागणी होण्याची शक्यता येथे नाकारता येणार नाही. एकंदरीत या मतदारसंघात भाजप व कॉँग्रेस अशी सरळ जरी लढतीचे चित्र निर्माण झालेल बंडखोरीचे ग्रहण दोन्ही पक्षांना डोक्याला ताप लावणारे नक्की ठरतील, मात्र वरिष्ठ पातळी वरून हे बंडखोरीचे बंड शमविष्यासाठी प्रयत्न झाले तर परिस्थिती काही वेगळी असेल येवढे मात्र निश्चित आहे . तसेच शिवसेना शिंदे गटाकडून संतोष डीवरे व अपक्ष म्हणून सुनिल विंचनकर हे सुध्दा यावेळी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.