Malkapur Bus Accident: मलकापुरमधील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना मोठी मदत जाहीर

Malkapur Bus Accident
Malkapur Bus Accident
Updated on

बुलढाणा जिल्‍ह्यात अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून मलकापूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सततच्या घडणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. जिह्यात भीषण अपघातांच्‍या घटना ताज्या असतांनाच पुन्हा आज (ता.२९) पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळील उड्डाण पुलावर दोन लक्झरी बसता भीषण अपघातात झाला.

घटनास्थळी ५ तर बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर २५ जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

हिंगोली येथील काही भाविक हे अमरनाथ येथे दर्शनाकरीता गेले होते. दर्शन घेऊन हिंगोली करीता परतीच्या मार्गाने निघालेले ४० प्रवाशी एका ट्रॅव्हल्स कंपनीची लक्‍झरी बस क्र. एम.एच.०८ - ९४५८ ने निघाले होते. दरम्यान आज २९ जुलैच्या पहाटे ३:१५ वाजेच्या सुमारास लक्झरी बसला नागपूर येथून नाशिकला जात असलेल्या बसने धडक दिली.

यामध्ये सदर दोन्ही लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अमरनाथ येथून दर्शन घेवून घराची ओढ लागलेल्या प्रवाशांपैकी ५ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या घटनेत २५ प्रवासी जखमी झालेले असून, जखमींपैकी काही प्रवाशांना बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आले होते. त्यापैकी एका प्रवाशांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अशाप्रकारे ६ प्रवाशांना या अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले.

Malkapur Bus Accident
Bjp Mission 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे फेरबदल, पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना मिळाली ही जबाबदारी


अपघातामध्ये संतोष आनंदराव जगताप, रा.भाडेगाव ता. हिंगोली ( ड्रायव्हर), राधाबाई सखाराम गाडे, रा. जयपूर तालुका हिंगोली, अर्चना गोपाल घुळसे, रा.लोहगाव ता. हिंगोली, सचिन शिवाजी महाडे, रा.लोहगाव ता. हिंगोली, शिवाजी धनाजी जगताप, रा. भाडेगाव ता.हिंगोली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बुलढाणा येथे उपचार घेत असलेल्या कान्हापात्राबाई यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अद्यापही काही प्रवाशांना गंभीर इजा झालेल्या असल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. (latest marathi news)


राष्ट्रीय महामार्गावर आक्रोश व भयावह स्‍थिती

पहाटे दरम्यान झालेल्या या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र आक्रोश व भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातामध्ये जखमींना तातडीने उपजिल्हा रूग्णालय मलकापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. ५ जणांना डोक्याला व पोटात गंभीर इजा झालेल्या असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात  रेफर करण्यात आले.

Malkapur Bus Accident
Sharad Pawar News : मोदींच्या पुरस्कारासाठी शरद पवार पुण्यातच थांबणार! राज्यसभेत केजरीवालांना झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.