संतापजनक! कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला अटक

संतापजनक! कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला अटक
Updated on

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्याला गुरुवारी (ता.15) मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या घटनेतील आरोपीला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे.

संतापजनक! कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला अटक
क्या बात है! अडीच लाख अभ्यासक्रमांची माहिती एका क्‍लिकवर; लाखो विद्यार्थ्यांना होणार लाभ

आरोग्य विभागाच्या वतीने सडक अर्जुनी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर लावण्यात आले आहे. या सेंटरमध्ये गुरुवारी (ता. 15) सकाळी 11 च्या सुमारास कोहमारा येथील दिनेश श्रीराम मसराम कुटुंबासह चाचणीसाठी आला. त्यानंतर 3 वाजून 40 मिनिटांनी रिपोर्ट लवकर द्या, म्हणून त्याने कोविड सेंटरचे कर्मचारी भौतिक देवराज वैद्य यांच्याशी वाद घातला. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. विनोद भुते हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनासुद्धा दिनेश मसरामने शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे, तर पुढे पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी डॉ. विनोद भुते यांच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश मसराम याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कामबंद आंदोलन करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन पाठविले.

आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी

या घटनेतील आरोपी दिनेश मसराम याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती ठाणेदार सचिन वांगळे यांनी दिली.

संतापजनक! कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला अटक
"मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे उचित नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हवी. ही मुख्य मागणी आहे. भीतीदायक वातावरणात ड्यूटी करणे शक्‍य नाही. कोविड सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

-डॉ. देव चांदेवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, डव्वा.

कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणी हल्ला करीत असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही.

-सचिन वांगळे, ठाणेदार, डुग्गीपार.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.