तो म्हणाला, 'माझी भूक भागली'; लैंगिक शोषण करून पत्नीला सोडलं वाऱ्यावर; दर्यापुरातील घटना  

man leave his wife at her house after taking advantage in Amravati
man leave his wife at her house after taking advantage in Amravati
Updated on

अमरावती ः अल्पवयीन असतानापासून तिचे अन्‌ त्याचे सूत जुळले. त्याने अपहरण करून पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर माझी भूक भागली, असे म्हणून तिला वाऱ्यावर सोडले.

ग्रामीण भागातील एका गावात ही घटना घडली. मो. तलहासीफ मो. शफीउल्ला (वय 24, रा. दर्यापूर), असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध रहिमापूर ठाण्यात अपहरण, अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तो पसार असल्याचे रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांनी सांगितले. 

पीडित युवती अल्पवयीन असतानापासून तिची संशयित आरोपी मो. तलहासीफ याच्यासोबत ओळख होती. त्याने कमी वय असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेला गर्भधारणा झाल्यानंतर तिच्यासोबत लग्न करून तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर बरेच दिवसांपर्यंत त्याच्याकडून लैंगिक अत्याचार सुरूच होता. 

17 मार्च 2021 रोजी संशयित आरोपीने पीडितेला रात्रीच्या वेळी तिच्या माहेरी नेऊन सोडले. असे करण्याबाबत पीडितेने त्याला जाब विचारला असता, पीडितेला मानसिक धक्का बसेल असे उत्तर त्याने दिले. आपली भूक भागली असून, आता वागवत नाही, असे उत्तर त्याने दिले. असा आरोप पीडितेने रहिमापूर ठाण्यात शनिवारी (ता. 20) दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो पसार असल्याचे दिसून आले. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
-सचिन इंगळे, 
ठाणेदार, रहिमापूर ठाणे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()