फोन आला म्हणून कडाक्याची थंडी असूनही गेला गच्चीवर अन् सकाळी आढळला युवकाचा मृतदेह   

Man who calling from roof was no more due to heavy cold
Man who calling from roof was no more due to heavy cold
Updated on

लाखांदूर (जि. भंडारा) : रात्री घरातील सर्व मंडळी झोपली असताना घराच्या गच्चीवर चढून मोबाईलवर बोलत असलेल्या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. अमोल राजू रहेले असे मृत युवकाचे नाव आहे. 

पोलिस सूत्रानुसार, शुक्रवारी (ता. २५) रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील सर्व मंडळी झोपली असताना राजू घराच्या गच्चीवर चढून मोबाईल फोनवर बोलत होता. कडाक्‍याच्या थंडीत मोबाईल फोनवर बोलत असताना तो गच्चीवरच कोसळला. यामुळे तो किरकोळ जखमी होऊन बेशुद्ध झाला. 

त्याची कोणालाही माहिती नसल्याने तो तसाच पडून होता. रात्रभर गच्चीवर थंडीत कुडकुडल्याने त्याचा मृत्यू झाला. आज, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह गच्चीवर आढळून आला. घटनेची लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

अचानक वाढली थंडी 

तापमानाचा पारा 27 अंशावरून अचानक 10 अंशापर्यंत खाली आला आणि कपाटात बंदिस्त असलेले स्वेटर, मफलर, कानटोपरे, हातामोजे, पायमोजे, दुलाई ब्लॅंकेट आदी उबदार वस्तू बाहेर निघाल्या. रात्री पारा खाली आला की वातावरणातील गारवा वाढतो आणि ग्रामीण भागातील शेतात, गावातील चौकाचौकात आणि घराघरासमोर शेकोट्‌या पेट घेतात.

हळूहळू उब घेण्याकरिता शेकोटी लगत गर्दी जमते ग्रामपंचायत निवडणुका असो, रस्त्याचे उद्‌घाटन असो वा शेतकऱ्यांचे आंदोलन यावर जोरदार चर्चा झडतात. वातावरण विश्‍लेषांकानी अजून काही दिवस तरी ही बोचरी थंडी जाणार नाही असा अंदाज वर्तवीला आहे. मात्र थंडी बोचरी असली तरी या निमित्त लोक एकत्र येतात ही जमेची बाजू आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.