छगन भुजबळांना लोळावलं नाही तर माझं नाव बदलेन; मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

जिल्ह्यातील सभेत बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे
Maratha reservation
Maratha reservation
Updated on

वाशिम- जिल्ह्यातील सभेत बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. छगन भुजबळ यांना नीट केल्याशिवाय सोडणार नाही. त्यांना सुट्टी नाही. त्यांना नाही लोळवलं तर माझं नाव बदलून ठेवीन, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. (Maratha reservation andolan manoj jarange patil criticize minister chhagan bhujbal in washim )

ओबीसी आणि मराठा समाजामध्ये प्रेम आहे. सामान्य ओबीसी समाजात आमचं मन गुततं. एकमेकांना घास दिल्याशिवाय आपण जेवत नाही. कुणाला दु:ख झालं तर एक मिनिटात आपण एकमेकांच्या मदतीला जातो. म्हणून म्हणतो त्यांचं ऐकू नका. चार दोघं जणांना त्यांनी पार्टी दिली असेल, असं म्हणत जरांगेनी भुजबळांवर हल्लाबोल केला. जशासतसं उत्तर देण्यास आम्हाला भाग पाडू नका, असंही ते म्हणाले.

Maratha reservation
Nanded : मनोज जरांगे यांच्या जिल्ह्यात चार ठिकाणी सभा

छगन भुजबळांचं ऐकू नका. त्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर सरकारला सुद्दा सुट्टी नाही, असं जरागे म्हणाले. शांततेत आंदोलन करा. २४ डिसेंबरपर्यंत उग्र आंदोलन करु नका. सर्व मराठा एकत्र आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही वेगळं आरक्षण करायचं नाही. गावागावात जाऊन सर्वांना जागे करा, असं जरांगे पाटील म्हणाले.

Maratha reservation
Chhagan Bhujbal News: लोकसभेतही ‘हेच’ चित्र उमटेल : छगन भुजबळ

आपले लेकरं आरक्षणाची वाट पाहात आहेत. आतापर्यंत ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. २४ डिसेंबरला सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेल. एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही. मी कधीही अपमान सहन करत नाही. पण, सध्या नाईलाज आहे. माझ्या गोरगरिब मराठ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून मी शांत आहे, असं जरांगे पाटी म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.