घरगुती उपचार, गोळ्या घेऊ नका; सुरक्षित गर्भपातासाठी आहे ‘मर्जी हॉटलाइन’; माहितीअभावी आठ टक्के महिलांचा मृत्यू

The marji hotline is for safe abortion Yavatmal news
The marji hotline is for safe abortion Yavatmal news
Updated on

यवतमाळ : सुरक्षित गर्भपात करता येतो याबद्दल समाजात अजूनही पुरेशी माहिती नाही. माहितीच्या अभावी अनेकदा घरगुती उपचार, गोळ्या घेऊन गर्भपाताचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे महिलांच्या जिवाला धोका निर्माण होतो. सुरक्षित गर्भपातासाठी राज्यस्तरावर ‘मर्जी’ हॉटलाइन तयार करण्यात आली आहे. पुणे येथील सम्यक संशोधन आणि संसाधन केंद्राने यासाठी पुढाकार घेतला आहे.

एका फोनवर महिलांना गर्भपाताबद्दल तांत्रिक माहिती, गर्भपात कायदा, कायदेशीर मार्गदर्शन मिळणार आहे. गर्भपात हा कुठल्याही स्त्रिच्या आयुष्यात कधी चुकीने तर कधी वैद्यकीय कारणाने येणारा प्रसंग आहे. भारतात गर्भपाताला सशर्त परवानगी आहे. म्हणजेच काही ठराविक परिस्थितीत तज्ज्ञांना गर्भपाताची परवानगी आहे.

मात्र, महिलांना याची योग्य माहिती मिळत नाही. त्या समाजाच्या भीतीपोटी तज्ज्ञांकडे न जाता गावठी, अशास्त्रीय उपाय करतात. २०१२ च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी ५५ हजार मातामृत्यू होतात. एकूण मातामृत्यूंपैकी आठ टक्के मृत्यू असुरक्षित गर्भपातामुळे होतात. ही चिंताजनक आकडेवारी आहे. सुरक्षित गर्भपात सेवा मिळाल्यास नक्कीच मृत्यू टाळता येऊ शकतात. या उद्देशाने ‘मर्जी’ हॉटलाइन सुरू करण्यात आली आहे.

गर्भपाताची कारणे

कुटुंब नियोजन, घटस्फोटीत किंवा एकटी स्त्री असणे, पहिले मूल लहान असणे, मुलगाच हवा असा हट्ट, विवाहापूर्वी गर्भ राहणे, अत्याचारातून गर्भधारणा इत्यादी गर्भपाताची कारणे आहेत. एका वर्षात ६४ लाख गर्भपात होतात. त्यापैकी लिंगनिदान करून होणाऱ्या गर्भपाताचे प्रमाण नऊ टक्के, म्हणजेच पाच लाख ७० हजार आहे.

कुणाला परवानगी

गर्भवतीच्या जिवाला धोका असणे, गर्भधारणेमुळे स्त्रिच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्‍यता असणे, गर्भात शारीरिक व मानसिक विकलांगता असणे, अत्याचारामुळे गर्भधारणा झालेली असणे, गर्भनिरोधकांच्या अयशस्वीतेमुळे अथवा अयशस्वी वापरामुळे गर्भधारणा झाली असल्यास सरकारी किंवा सरकारमान्य गर्भपात केंद्रात कायदेशीर गर्भपात सेवा मिळू शकते.

तातडीची सेवा असल्याने ‘हॉटलाइन’
सोमवार ते शुक्रवार सुरक्षित गर्भतपासासाठी महिलांनी ९०७५७६४७६३ या क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती मिळू शकते. तातडीची सेवा असल्याने ‘हॉटलाइन’ उल्लेख करण्यात आला आहे.
- डॉ. आनंद पवार,
कार्यकारी संचालक, सम्यक संशोधन आणि संसाधन केंद्र, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.