Maternal Death :मेळघाटात मातामृत्यूचे सत्र सुरूच;सलोना गावातील प्रसूत महिलेचा मृत्यू

मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तर आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
Maternal death
Maternal death sakal
Updated on

अचलपूर : मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तर आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सलोना गावातील सोनी धोत्रे या प्रसूत महिलेचा गुरुवारी (ता.२७) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती आहे. मागील आठवड्यात धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या बाल तथा मातामृत्यूची चौकशी सुरू असतानाच आता पुन्हा एकदा सलोना गावातील मातेचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. या घटनेमुळे मेळघाटातील महिलांचा जीव इतका स्वस्त झाला काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या गावातील सोनी धोत्रे या प्रसूत महिलेला २५ जून रोजी अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणीअंती सीझर करण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी सातच्या दरम्यान तिचे सीझर झाले. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यावेळी महिलेची प्रकृती ठीक होती. मात्र २६ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी सदर महिलेला व तिच्या बाळाला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

त्याठिकाणी महिलेवर उपचार करण्यात आले. मात्र २७ जून रोजी सकाळी सात वाजेदरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र, बाळ ठणठणीत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी सांगितले. या महिलेच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. मेळघाटात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना प्रशासन उपाययोजना करण्यात कमी का पडते, असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष भोवले

महिलेकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचे जवळपास बारा दिवस दुर्लक्ष झाले आरोग्य कर्मचाऱ्यांनी ती रुग्णालयातून पळून आल्यावर वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित त्या महिलेला जीव गमवावा लागला नसता.

सदर प्रसूत महिलेला व बाळाला बुधवारी (ता.२६) रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती ठीक आहे, मात्र महिलेच्या छातीत रक्ताच्या गाठी झाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सदर महिलेचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

-डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

सदर महिलेला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती महिलेचे सायंकाळी सीझर केले. त्यावेळी महिलेची प्रकृती स्थिर होती. मात्र, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रकृती एकाकी चिंताजनक झाली. ज्यामुळे महिलेला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

-डॉ. क्रांती शिलेदार, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com