तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनामुळे लॉगकडाउन करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद झाले. तर जिल्हास्तरावर, तालुक्यात पिकणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या पाठवणे शक्य नसल्याने त्या गुराढोरांच्या वैरण बनले आहेत. तर काही शेतकरी रत्यावर फेकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अंदाजपत्रक कोलमडले असून शेती पूरक व्यवसाय देखील बंद पडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्लिक करा- बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त
ना नफा ना तोटा
तेल्हारा तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून पाऊस कमी पडत होता. मागच्या वर्षी अति पाऊस पडल्यामुळे खरीप पिके हातची गेली. पण भूगर्भातील पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली म्हणून ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी आपल्या शेतामध्ये पालेभाज्या व फळभाज्या यांची उत्पादन घेण्याचे ठरवले. अतिशय कष्ट करून लाखो रुपये खर्च करून पिके वाढवली. पण आता ते काढण्यास आली असता बाजारपेठ नाही म्हणून मातीमोल भावात विकावा लागत त्यामुळे नफा तर नाही तोडणी खर्च देखील निघत नाही.
या भाजीपाल्याचा उपयोग वैरण म्हणून केला जात आहे. तर काही शेतकरी भाजीपाला फळभाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत. तसेच शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. शहराला दूध पुरवठा करणारी आजूबाजूच्या खेड्यातील लोक आहे. त्यांनादेखील दूध पोहोचवण्यासाठी अडचणी येत आहे. या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अंदाजपत्रक कोलमडले असून तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा- सांगा आता पीक कर्ज फेडायचे कसे
तोडणीचा खर्चही निघत नाही
शेतामध्ये पालक, गवार, ठेमसी, बरबटी, भेंडी, टोमॅटो, काकडी आदी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. पण बाजारपेठ नसल्याने मातीमोल भावात विकावे लागते. तोडणीचा खर्च निघत नाही. परिणामी गुरांसाठी वैरण म्हणून त्याचा उपयोग करावा लागत आहे. नाहीतर रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहे.
-रमेश येऊल, शेतकरी, दानापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.