क्रूरतेचा कळस! कातडीसाठी विजेचा प्रवाह लावून बिबट्याची केली हत्या; नवेगावबांधमधील घटना 

men gives electric shock to Leopard in Nvaegaonbandh
men gives electric shock to Leopard in Nvaegaonbandh
Updated on

नवेगावबांध (जि. गोंदिया)स ः बिबट, वाघाचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना रात्री नवेगावबांध पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य आरोपी देविदास दादू मरस्कोल्हे (वय ५२, रा. झाडगाव, जि. भंडारा) येथील रहिवासी असून विद्युत प्रवाहाने बिबट्याची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे आरोपींनी बिबट्याच्या अवयवांची परस्पर विल्हेवाट आपल्या साथीदाराच्या साहाय्याने लावल्याचे वनविभागाच्या तपासात निष्पन्न झाले.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात या तिघांना हजर करून २५ नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी मागण्यात आली होती. वनविभागाच्या तपासात पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोवर्धन सुरेश सिंधीमेश्राम (वय ३०, रा. सानगाव, जि. भंडारा), महेंद्र काशिराम मोहनकर (वय २७, रा. सानगाव), रामाजी रूपराम खेडकर (वय ४५, रा. सानगडी), वसंत शालिकराम खेडकर (वय ५० रा. झाडगाव, जि. भंडारा), महेश धनपाल घरडे (वय ३०, रा. झांजिया) यांचा समावेश आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास मरस्कोल्हे हा आहे. त्याने आपल्या साथीदारांसह बिबट्याची हत्या करून त्याचे चामडे व इतर अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बिबट्याचे कातडे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना नवेगावबांध पोलिसांनी बुधनवारी (ता. १८) अटक केली हेती. अप्पर पोलिस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी अतुल कुलकर्णी यांना काही लोक बिबट्याची कातडी पाच लाख रुपयात विक्री करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथून भिवखिडकी शिवारात आलेले आहेत, अशी माहिती मिळाली होती. 

या माहितीची खात्री करून नवेगावबांध पोलिस ठाण्याचे पोस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी छापा टाकून पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार करून बिबट्याची कातडी पाच लाख रुपयांत खरेदी करण्याची बोलणी केली. त्यानंतर आरोपींनी भिवखिडकी शिवारातील लांजेवार राईस मिलजवळील एका शेतात तिघांनी बिबट्याची कातडी, काळीज, गुडघा, दात, पंजे हे अवयव स्वतःजवळ विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवले होते. 

त्यानंतर खरेदीची बोलणी झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली होती. देविदास दागो मरस्कोल्हे (वय ५२) रा. झाडगाव जि. भंडारा), मंगेश केशव गायधने (वय ४४ ) रा. पोहरा, ता. लाखनी, रजनी पुरुषोत्तम पोगडे (वय 32, रा. सानगडी, ता. साकोली) या तीन आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातील बिबट कातडे व अवयव घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आले.

प्रकरण वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे वर्ग

हे प्रकरण पोलिसांनी वनपरिक्षेत्राधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविले आहे. या तिन्ही आरोपींवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक व प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधिन वनाधिकारी अग्रिम सैनी (भारतीय वनसेवा), वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे, वनरक्षक मिथुन चव्हाण, विशाल बोराडे पुढील चौकशी करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.