'कर्जमाफीचे मेसेज तर आले, पण यादीत नावच नाही; सांगा आम्ही करायचं काय?'

message came to loan waiver but name not display in list
message came to loan waiver but name not display in list
Updated on

यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. राळेगावातील काही शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाल्याचे मेसेजही आले. पण, प्रत्यक्षात मात्र यादीत नावच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले आहे. यादीतील नमूद विशिष्ट क्रमांक आधार कार्ड व बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण तातडीने करावे, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देता येईल, असे मेसेज शेतकऱ्यांना १६ सप्टेंबरपासून येत आहेत. त्यानंतर शेतकरी आपले सेवा केंद्रात, बँकेत व सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले. परंतु, तीनही ठिकाणी त्यांचे नाव त्यांना यादीत मिळाले नाही. यापूर्वी कर्जमाफीचा मेसेज आला की, शेतकऱ्यांचे नाव यादीत तत्काळ यायचे. मेसेज येणे व नाव यादीत येणे, या दोन्ही प्रक्रिया सारख्याच व्हायच्या. परंतु, यंदा मेसेज येऊनही सहा दिवस होऊन शेतकऱ्यांचे नाव यादीत आले नाही. 

याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता, नाव मागेपुढे येऊ शकते. परंतु, मेसेज आला म्हणजे शंभर टक्‍के कर्जमाफी झाली, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. बँकही असेच उत्तर देते. यादीत नाव न आल्याने कदाचित फेक मेसेज तर आपल्याला आला नसावा, अशाही शंका शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. एकतर संबंधित सहकार विभागाने कर्जमाफीची यादी तत्काळ अद्यावत करावी किंवा याबाबत समोर येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.