दुधी भोपळ्याला कवडीमोल भाव; दहा क्विंटल मागे नफा १४० रुपये

दुधी भोपळ्याला कवडीमोल भाव; दहा क्विंटल मागे नफा १४० रुपये
Updated on

पथ्रोट (जि. अमरावती) : दुधी भोपळ्याच्या लागवडीतून मिळालेल्या उत्पादनाच्या १० क्विंटल विक्री मागे फक्त १४० रुपये नफा मिळाल्याने उत्पादनाला कवडीमोल भाव सांगण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पथ्रोट येथील शेतकरी ओमप्रकाश बोबडे यांनी एक एकरमध्ये दुधी भोपळ्याची लागवड केली होती. तीन महिने सततची मशागत व पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च केल्यानंतर दुधी भोपळ्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली. एक महिन्याच्या कालावधीमध्ये निघालेल्या ७० ते ८० क्विंटल मालाची त्यांनी कधी पथ्रोट तर कधी परतवाड्याच्या बाजारपेठेत होलसेल दरात विक्री केली.

परंतु, आतापर्यंत त्यांना फक्त पंधरा हजार रुपयांची रक्कम मिळाली. त्यामुळे आता तोडलेल्या दहा क्विंटल दुधी भोपळ्याला अधिक भाव मिळेल, या आशेने त्यांनी नागपूरच्या बाजारपेठेत पाठवले. मात्र, तेथे साडेतीनशे रुपये क्विंटलनुसार गाडीचे भाडे, दलाली, पॅकिंग खर्च व इतर खर्च मिळून दुधी भोपळ्याला मिळालेल्या दरामधून खर्च वजा जाता त्यांच्या वाट्यावर फक्त १४० रुपये आले. पारंपरिक पिकांत मिळणारा तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी शेतामध्ये भाजीपाला यासारख्या पिकाची लागवड करून उत्पन्नवाढीचा प्रयत्न करतो. परंतु, त्यातही त्यांना कमी दराचाच मार खावा लागत असल्याने ते खचलेले आहेत.

दुधी भोपळ्याला कवडीमोल भाव; दहा क्विंटल मागे नफा १४० रुपये
‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट
शहरापासून ग्रामीणमधील नागरिकांपर्यंत दिवसेंदिवस आरोग्याची काळजी घेताना दुधी भोपळ्याचा रस व जेवणातील त्याचा वापर वाढल्याचा अंदाज घेऊन दुधी भोपळ्याच्या लागवडीला प्राधान्य दिले. परंतु, भाव मिळत नसल्याने लावलेला खर्चही निघाला नाही.
- ओमप्रकाश बोबडे, शेतकरी, पथ्रोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.