Dharmarao Atram : मंत्र्यांनी हाती घेतला झाडू अन् केले वसतिगृह स्वच्छ

Dharmarao Atram : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांनी सिरोंचातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या वसतिगृहात अचानक भेट देत अस्वच्छता पाहून स्वतः झाडू हाती घेतली आणि वसतिगृह स्वच्छ केले.
Dharmarao Baba Atram
Dharmarao Baba Atram Sakal
Updated on

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी सिरोंचा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मुलांच्या वसतिगृहाला आकस्मिक भेट दिली.

वसतिगृहातील अस्वच्छता बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी हातात फावडे, झाडू घेतले अन् स्वत: वसतिगृहाची खोली स्वच्छ केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर कॉल करून झाप झाप झापले.

गेल्या तीन दिवसांपासून धर्मराव बाबा आत्राम गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विद्यार्थी वसतिगृहाला त्यांनी भेट दिली. येथे घाणीचे साम्राज्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. वसतिगृहाची इमारत पूर्णपणे गळत असून तेथील आलमारीत खर्ऱ्याची पन्नीही मंत्र्यांना दिसून आली. मंत्री वसतिगृहाची पाहणी करत असताना वसतिगृहात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.

काही वेळानंतर वसतिगृह अधीक्षक ते पोहचले. त्या अधीक्षकाला तेथील कचरा दाखवत, अशी असते का स्वच्छता, असे सवाल आत्राम यांनी केली. त्यानंतर आत्राम यांनी स्वतः फावडे हातात घेऊन संपूर्ण खोली स्वच्छ केली.

वसतिगृहातील सुविधांचा अभाव लक्षात येताच मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फोनवर कडक शब्दात झापले. तुम्हाला सरकार फुकटचा पगार देते का, असा प्रश्न विचारत कामात हयगय केल्यास घरी पाठवण्याची तंबी त्यांनी दिली. उपस्थित आदिवासी विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या व पाच दिवसांच्या आत स्वच्छता व इमारतीची दुरुस्ती न झाल्यास तुमच्या विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.