Misuse of Right to Information Act In Maharashtra
अविनाश साबापुरे
यवतमाळ : आले मनात की टाकला आरटीआय, असा खाक्या सध्या अनेकांनी अवलंबला आहे. आरटीआयच्या अशा अनिर्बंध वापराचा नमुना नुकताच पुढे आला. एका व्यक्तीने माहिती अधिकारात तब्बल दहा हजार अर्ज केले. विशेष म्हणजे, केवळ तीन वर्षात दोन हजार ७८८ द्वितीय अपील दाखल केले. परंतु, यात कायद्याचा दुरुपयोग होतोय, असा निष्कर्ष नोंदवून माहिती आयुक्तांनी अवघ्या एकाच दिवसात हे सर्व अपील फेटाळून लावले.