लेक आमदार तरी ८० वर्षीय मातेचा संघर्ष सुरूच…; आजही विकतायत बांबूच्या टोपल्या

mla kishor jorgewar mother gangubai jorgewar selling Bamboo baskets in chandrapur marathi news
mla kishor jorgewar mother gangubai jorgewar selling Bamboo baskets in chandrapur marathi news
Updated on

आमदार-खासदार म्हटलं की आपल्यासमोर एक ठराविक व्यक्तिरेखा उभी राहते. जनतेतून निवडणून गेलेले हे लोकप्रतिनीधी सामान्य माणसं राहत नाहीत, तर बऱ्याचदा त्यांनी व्हिआयपी कल्चरची बाधा झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र याला काही अपवाद देखील आहेत.

काही आमदारांचा थाटबाट पाहायाला मिळतो तर राज्यात असेही काही आमदार आहेत ज्यांची नाळ अजूनही साधेपणाशी जोडलेली आहे. अशाच एका आमदाराच्या मातोश्रींनी सर्वसामान्यांची मने जिंकून घेतली आहेच. मुलगा आमदार असून ही माऊली आई महाकाली देवीच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकतेय.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

mla kishor jorgewar mother gangubai jorgewar selling Bamboo baskets in chandrapur marathi news
Roshni Shinde News : ती आई होऊ नये म्हणून…; रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी आव्हाडांची घणाघाती टीका

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार अर्थात अम्मा जोरगेवार (वय ८० वर्ष) या मागील पन्नास वर्षांपासून चंद्रपुरात बांबूपासून बनवलेल्या ताटवे-टोपल्या विकत आहेत. त्या मागची पन्नास वर्षे नेटाने हा व्यवसाय अम्मा जोरगेवार यांनी यंदा देखील देवी महाकाली यात्रेत थेट फुटपाथवर आपला व्यवसाय थाटलाय आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

mla kishor jorgewar mother gangubai jorgewar selling Bamboo baskets in chandrapur marathi news
Ramdas Athawale Clothes : आठवले अतरंगी कपडे का घालतात? स्वतःचं सांगितलं कारण, म्हणाले…

मुलगा आमदार झाला तरी गंगुबाई जोरगेवार या त्यांचा पारंपारिक व्यवसाय करत आहेत. बांबू ताटवे, टोपल्या यांचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपला व्यवसाय मोठ्या अभिमानाने करताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()