Sindkhed Raja : सिंदखेड राजा येथे सापडलेली पुरातन शेषशायी विष्णू मूर्ती वस्तू संग्रहालयात ठेवावी; आमदार शिंगणेंची मागणी

शिवमंदिर आढळल्यानंतर त्याच्या पायापर्यंत खोदण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वी तेथे अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली शेषनाग भगवंताचे विश्राम अवस्थेतील मूर्ती आढळून आली आहे,
MLA Rajendra Shingne demanded ancient Vishnu idol should be kept in museum  found at sindkhed raja
MLA Rajendra Shingne demanded ancient Vishnu idol should be kept in museum found at sindkhed raja
Updated on

सिंदखेड राजा : सुबक व अतिशय सुंदर शेषशायी विष्णू मूर्ती मातृतीर्थातील पुरातत्त्व विभागाच्या वस्तू संग्रहामध्ये ठेवावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.

शिंगणे यांनी सांगितले की, राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर केंद्रीय पुरातत्त्व विभागाला उत्खनन करताना आढळलेली मूर्ती सुंदर आहे, दुर्मिळ आहे आणि खरं म्हटलं तर तिची किंमत काही केल्या केली जाऊ शकत नाही. एवढी ती दुर्मिळ आहे. सिंदखेड राजामध्ये अनेक दिवसापासून उत्खनन करत असताना दुर्मिळ मूर्ती आढळून येत आहेत. शहरातील तसेच मतदारसंघातील नागरिकांची ही शेषशाही विष्णूची मूर्ती ही शहरामध्ये असलेल्या वस्तू संग्रहालयामध्येच ठेवावी. शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही दुर्मिळ मूर्ती पाहता येईल असे मत शिंगणे यांनी व्यक्त केले .

MLA Rajendra Shingne demanded ancient Vishnu idol should be kept in museum  found at sindkhed raja
Manoj Jarange : इकडे आड-तिकडे विहीर! 'सगेसोयरे'च्या निर्णयाअगोदर सर्वपक्षीय बैठक; काय आहे सरकारच्या मनात? जरांगे म्हणतात...

शिवमंदिर आढळल्यानंतर त्याच्या पायापर्यंत खोदण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वी तेथे अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली शेषनाग भगवंताचे विश्राम अवस्थेतील मूर्ती आढळून आली आहे, ही मूर्ती आढळून आल्यानंतर नागपूर येथील केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः मूर्ती काढण्याचे काम केले. शेषशाही मूर्ती म्हणजे शेषनागावर विराजमान विष्णूची मूर्ती, माता लक्ष्मी त्यांचे चरण स्पर्श करून त्यांची सेवा करत आहेत. ही अत्यंत कोरीव व अतिशय दुर्मिळ मूर्ती असून त्यासोबतत समुद्रमंथनाचा देखावा आहे. तर एका बाजूने देव आहेत तर दुसऱ्या बाजूने दानव असल्याचे पहायला मिळत आहे.

MLA Rajendra Shingne demanded ancient Vishnu idol should be kept in museum  found at sindkhed raja
Manoj Jarange : ''हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ... त्यांचं राजकीय करिअर संपवणार'' मनोज जरांगे संतापले; म्हणाले...

केंद्रीय विभागाकडून मूर्तीचे उत्खनन करत असताना काळजी घेतल्यामुळे कुठेही मूर्तीला इजा झाली नाही, शेषशाही विष्णू भगवानाची मूर्ती ही अकराव्या किंवा बाराव्या शतकामधील असल्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी, शहराध्यक्ष सिताराम चौधरी तालुकाध्यक्ष जगन सहाने, वंशज शिवाजी राजे जाधव,सतीश काळे,यासीन शेख, गजानन देशमुख, सतीश सरोदे, आरेफ चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.