Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

Mokhada News : गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान केवळ अर्धा तास तुफान वादळी पाऊस मोखाडा शहरा लगतच्या भागात झाला आहे.
mokhada experiences chaos as retreating monsoon brings heavy rain; trees fall near datt mandi
heavy rainsakal
Updated on

मोखाडा: मोखाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान केवळ अर्धा तास तुफान वादळी पाऊस मोखाडा शहरा लगतच्या भागात झाला आहे. या पावसाने मोखाड्यातील दत्त मंदीर परिसरात झाडे कोसळुन दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.

येथे नियमीत नागरीकांची वर्दळ असते. मात्र, वेळीच येथील नागरीक बाजुला गेल्याने, सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. 

mokhada experiences chaos as retreating monsoon brings heavy rain; trees fall near datt mandi
पहिल्या पावसानंतर भातपेरणीला सुरुवात

पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. हा पाऊस रोजच मोखाडा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात कोसळत आहे. गुरुवारी  10  ऑक्टोबर दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक वादळी पावसाने मोखाड्याला झोडपले आहे. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अर्धा तास झालेल्या वादळी पावसाने, मोखाड्यातील दत्त मंदीर परिसरात झाडे कोसळली आहे. झाडे कोसळल्याने दोन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या परिसरात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते. परंतु अचानक पाऊस आल्याने, येथील नागरीकांनी मिळेल तेथे आसरा घेतला. त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.