मोखाडा - गेली दोन तीन दिवसांपासून परतीचा पाऊस मोखाड्यात मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे परिपक्व व कापणीला आलेले ऊभे पीक शेतातच आडवे झाले आहे. तर कापुन शेतात ठेवलेले पीक पावसाच्या पाण्याने, शेतातच तरंगु लागले आहे. हे पीक काळे पडुन कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक, डोळ्यासमोर वाया जात असल्याचे पाहुन शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहे.