मोखाडा - राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारला आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामीण भागात जाणवला आहे. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील सर्व 154 शाळांना टाळे लागले असुन सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना अघोषीत सुट्टी घेऊन घरी बसावे लागले आहे.
राज्यातील सर्व शिक्षक संघटना, आपल्या विविध 11 मागण्यांसाठी एक दिवसीय संपात ऊतरल्या आहेत. त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेला बसला आहे. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 154 शाळा आहेत. सर्व शिक्षक संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील सर्व शाळांना टाळे लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना अघोषीत सुट्टी मिळाली आहे. संपात ऊतरण्यासाठी शिक्षकांनी रजेचे अर्ज, पंचायत समिती कार्यालयात सादर केले आहेत.
तालुक्यातील 325 शिक्षक संपात ऊतरले आहेत. 347 कार्यालयात कार्यरत आहेत. 9 शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमास आहेत. तर 13 शिक्षक रजेवर आहेत. शिक्षक संपात ऊतरल्याने तालुक्यातील सर्व 8 वी पर्यंतच्या शाळा बंद आहेत. केवळ 9 व 10 वी चे वर्ग असलेला मोखाडा केंद्र शाळा तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयातील कंत्राटी कर्मचारी हजर असल्याने, तेथील वर्ग सुरू आहेत.
- वसंत महाले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, मोखाडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.