नागपूर : विदर्भातील बळीराजा ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होता, त्या मॉन्सूनने बुधवारी विदर्भात (Monsoon enters Vidarbha) अधिकृत ‘एन्ट्री’ केली. प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Department) मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले. मॉन्सूनचे यंदा अपेक्षेपेक्षा लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह (Farmers happy) सर्वसामान्यांसाठीही हा सुखद धक्का आहे. गेल्या दहा वर्षांत विदर्भात चौथ्यांदा मॉन्सून लवकर दाखल झाला आहे. (Monsoon-arrives-in-Vidarbha,-early-arrival-for-the-fourth-time-in-ten-years)
हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात अकरा जूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यानंतर मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित होते. तसा अंदाजही आम्ही वर्तविला होता. मात्र केरळकडून आलेल्या मॉन्सूनला पोषक वातावरण मिळाल्याने तीन दिवस आधीच दाखल झाला.
२१ मे रोजी अंदमानातून आगेकूच केलेल्या मॉन्सूनमध्ये अडथळा आल्याने केरळमध्ये तीन दिवस तो उशिरा आला. मात्र त्यानंतर अचानक वेग पकडून उर्वरित महाराष्ट्रासह विदर्भातही चोर पावलांनी हळूच प्रवेश केला. मॉन्सूनने एंट्री केली, पण दणक्यात पाऊस न पडल्याने थोडी निराशाही झाली. मॉन्सूनचे लवकर आगमन झाल्याने बळीराजा खूष असून, विदर्भात लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीत मॉन्सूनने ८० टक्के महाराष्ट्र व्यापला आहे.
आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकल्यास, गेल्या दहा वर्षांत यावर्षी चौथ्यांदा लवकर मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले आहे. २०१८ मध्ये ८ जूनलाच मॉन्सून आला होता. सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याने या आठवड्यात विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही जिल्ह्यांत येलो अलर्ट, काही जिल्ह्यांत १२ व १३ जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात गेल्या दहा वर्षांतील मॉन्सूनचे आगमन
वर्ष तारीख
२०२१ ९ जून
२०२० १२ जून
२०१९ २२ जून
२०१८ ८ जून
२०१७ १६ जून
२०१६ १८ जून
२०१५ १३ जून
२०१४ १९ जून
२०१३ ९ जून
२०१२ १७ जून
(Monsoon-arrives-in-Vidarbha,-early-arrival-for-the-fourth-time-in-ten-years)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.