Monsoon Update : मॉन्सूनचे तिसऱ्यांदा लवकर आगमन;पश्‍चिम विदर्भ ओला पण पूर्व अद्यापही कोरडाच

गेल्या दशकात विदर्भातील आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या तारखेवर नजर टाकल्यास, तिसऱ्यांदा मॉन्सूनने निर्धारित तारखेच्या आधी विदर्भात एन्ट्री केली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ८ जूनला, तर २०२१ मध्ये ९ जूनला मॉन्सूनने प्रवेश केला होता.
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

गेल्या दशकात विदर्भातील आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या तारखेवर नजर टाकल्यास, तिसऱ्यांदा मॉन्सूनने निर्धारित तारखेच्या आधी विदर्भात एन्ट्री केली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ८ जूनला, तर २०२१ मध्ये ९ जूनला मॉन्सूनने प्रवेश केला होता.

गतवर्षी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अडथळा आणल्यामुळे मॉन्सून प्रथमच उशिरा म्हणजे २३ जूनला दाखल झाला होता. पण या पावसाने अद्यापही संपूर्ण विदर्भाला व्यापले नसल्याने पश्‍चिम विदर्भ ओला झाला असला तरी पूर्व विदर्भ व नागपूर कोरडेच आहे.

विदर्भामध्ये अकोला, वर्धा, वाशीम जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्याची बातमी धडकली असताना नागपुरात मात्र ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी शहरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. कळमना, इतवारी आदी भागात पावसाने हजेरी लावल्याने रात्री गारवा निर्माण झाला होता.

विदर्भाच्या उंबऱ्यावर चार दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावलेली असताना नागपूरकरांत हजेरी लावलेली नव्हती. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. दिवसभर पावसाने दडी दिली. मात्र, रात्री उशिरा कळमन्यासह काही भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले.

विदर्भातील मॉन्सूनचे आगमन

वर्ष तारीख

२०२४ ११ जून

२०२३ २३ जून

२०२२ १६ जून

२०२१ ९ जून

२०२० १२ जून

२०१९ २२ जून

२०१८ ८ जून

२०१७ १६ जून

२०१६ १८ जून

२०१५ १३ जून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.