गोंदिया : भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू (killed) झाला होता. तर बुधवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला होता. या घटना ताज्या असतानाच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील नैनपूर गावाजवळ गुरुवारी (ता. ५) भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुलांसह आईला जीव गमवावा लागला. मागील काही दिवसांत अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण (road accident) वाढल्याचे पाहायला मिळत आहे. (Mother and two children were killed in a truck crash)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील घरतोडा येथून देवरीकडे जाण्यासाठी तुळशीराम मेश्राम हे दुचाकीने पत्नी व दोन मुलांसह निघाले होते. डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत नैनपूर गावाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक (road accident) दिली. या धडकेत पत्नी प्रीती तुळशीराम मेश्राम (३३), चिन्मय तुळशीराम मेश्राम (१०) व कृष्णा तुळशीराम मेश्राम यांचा मृत्यू (killed) झाला. तर गंभीर जखमी तुळशीराम रामा मेश्राम (४५) यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रकने दुचाकीला पाचशे मीटरपर्यंत फरफटत नेल्याची माहिती आहे. जखमी तुळशीराम मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. डुग्गीपार पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी ट्रकसह ट्रकचालकाला अटक केली आहे. मागील दोन्ही घटनांमध्येही ट्रकनेच दुचाकीला धडक (road accident) दिली होती.
भंडारा येथील घटनेत नागपुरातील आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता. आई आणि मुगला कामानिमित्त भंडाऱ्याला जात होते. नागपुरातील घटनेत आजोबा, नातू आणि सून डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जात होते. झालेल्या अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू (killed) झाला होता. तर आजच्या घटनेत मेश्राम कुटुंबावर काळाने घाला घातला. झालेल्या अपघातात पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.