अमरावतीतील मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण; संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक

Mother arrested in babys death in Amravati
Mother arrested in babys death in Amravati
Updated on

अमरावती : न्यू प्रभात कॉलनीत घराच्या आवारातील विहिरीत मुलाचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. ४) राजापेठ पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली. नम्रता मनीषसिंग परमार (वय ३०) असे अटक महिलेचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळीच राजापेठ पोलिसांनी महिला तसेच तिच्या भावाला चौकशीसाठी बोलविले होते. चौकशीनंतर सायंकाळी अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास न्यू. प्रभात कॉलनी येथील घरातून सव्वा महिन्याचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. ३० नोव्हेंबरला घराच्या आवारातील विहिरीत या बाळाचा मृतदेह आढळला.

घटना घडली तेव्हा घरात नम्रता आणि तिचा भाऊ असे दोघेच हजर होते. घटनेच्या दिवशी नम्रता तीस सेकंदासाठी बाथरुममध्ये गेली व परत आली असता, तिला बेडरुममधील बाळ बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तिने भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली.

घटनेच्या दिवशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुनाच्या गुन्ह्यांची नोंद घेतली होती. सहा दिवसांचा तपास तसेच काही लोकांचे बयाण नोंदविण्यात आल्यावर पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली.

बाळाच्या पित्याची ठाण्यात बंदद्वार चौकशी

पाचव्या दिवशी गुरुवारी बाळाच्या पित्याची राजापेठ ठाण्यात बंद द्वार चौकशी झाली. बिहारच्या एका गावात बाळाचे वडील राहतात. चौकशीत पोलिस नेमके कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. यासंदर्भात तपास अधिकाऱ्यांनी भाष्य करण्याचे टाळले. हत्येचे रहस्य पाचव्या दिवशी सुद्धा कायम होते.

संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक
परिस्थितीजन्य पुरावे आणि संशयाच्या आधारे बाळाच्या खुनाच्या गुन्ह्यात आई नम्रता हिला अटक झाली. शनिवारी (ता. पाच) विशेष न्यायालयापुढे हजर केले जाईल.
- किशोर सूर्यवंशी,
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()