Akola Crime News: नाकाला चिमटा लावला अन्... पोटच्या मुलीला आईनंच संपवलं अन् रचला खोटा बनाव, कारण...

आईनेच चिमुकलीचे प्राण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Akola Crime News
Akola Crime NewsEsakal
Updated on

नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव आईने केला. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये साडेपाच वर्षीय किशोरीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात मंगळवारी खदान पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला ताब्यात घेतलं आहे. या विषयी किशोरीचे वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला.

बलोदे लेआऊट मधील ही घटना आहे. लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती. या वादात किशोरीचा बळी गेल्याची चर्चा आहे. नाकाला चिमटा लावल्याने चिमुकल्या किशोरीचे प्राण गेले. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता.

Akola Crime News
Mumbai Crime: एअर हॉस्टेस हत्या प्रकरणाला नवे वळण, सफाई कामगाराने 'या' कारणामुळे केली हत्या

किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तपासात अनेक नव नवे खुलासे समोर आले. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचे केलेला देखावा समोर आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात.

Akola Crime News
Kolhapur Crime : 'तुम्ही गर्भलिंग निदान करून महिना दहा लाख मिळवता'; बनावट ACB अधिकाऱ्यांकडून डॉक्टरचं अपहरण, पोलिसांनी 'असा' लावला छडा

या महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर व आकाश राठोड काम पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()