खासदार सुप्रिया सुळे यांना आवडली वर्ध्याची पुरणपोळी

झुणका भाकर केंद्रावर केले जेवण
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे sakal
Updated on

वर्धा : खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (ता.२८) वर्ध्यात आल्या. वर्ध्यात मोठमोठे हॉटेल्स असताना त्यांनी सायंकाळचे जेवण येथील पाहुणचार नामक झुणका भाकर केंद्रात केले. यावेळी त्यांनी येथील पुरणपोळी देशातील सर्वोत्तम असल्याचा शेरा त्यांनी दिला.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे नागपूर दौऱ्यावर; पाहा व्हिडिओ

या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत सुबोध मोहिते होते. पाहुणचार या झुणका भाकर केंद्राचे त्यांनी उदघाटन केले. येथे असलेल्या झुणका भाकरसह, कढी, पाटवडीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. शिवाय जेवताना त्यांनी वर्ध्यातील पेट्रोलपंप विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा केली. या संदर्भात उद्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.

सुप्रिया सुळे
चौसाळा: निर्धारीत वेळेत शाळेचे गेट उघडलेच नाही

रविवारी (ता.२९) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता त्या वर्ध्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समीर देशमुख, संदीप किटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.