एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटनेने खळबळ
वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटनेने खळबळवैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटनेने खळबळ
Updated on

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. बुधवारी (ता. १०) रात्री साडेआठ ते नऊ वाजता दरम्यान ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक पाल असे मृत शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्याचे नाव आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. अशोक पाल हा एमबीबीएसमध्ये तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी महाविद्यालय परिसरातून डॉ. पाल जात असताना अनोळखी मारेकऱ्यांनी वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी धाव घेऊन रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. पालचा मृत्यू झाला.

वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटनेने खळबळ
किरीट सोमय्यांना धक्का; अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस कर्मचारी अन्सार बेग, बबलू चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात अद्यापही विद्यार्थी आक्रमक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()