गळा दाबून प्रेयसीचा खून; महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले

गळा दाबून प्रेयसीचा खून; महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले
Updated on

पवनी (जि. भंडारा) : तालुक्यातील चन्नेवाडा जंगलातील कृत्रिम पाणवठ्यात आढळलेला अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून तिचा प्रियकरानेच गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी ओमप्रकाश तुळशीराम खोब्रागडे (वय ४५) याला अटक केली आहे. (Murder-News-The-murder-of-by-strangulation-Bhandara-District-News-nad86)

२३ जुलैला चन्नेवाडा जंगलातील कृत्रिम तलावामध्ये अनोळखी महिलेचे मृतदेह आढळला होता. वनकर्मचारी सुषमा अश्रोबा नरवडे यांनी तोंडी रिपोर्टवरून पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली. या प्रकरणाचे तपासामध्ये घटनास्थळी कोणताही पुरावा किंवा सूत्र मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी चन्नेवाडा परिसरामध्ये गोपनीय बातमीदार लावले.

गळा दाबून प्रेयसीचा खून; महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश तुळशीराम खोब्रागडे (वय ४५) हा १८ जुलैला नागपूरहून गावी आला. त्याच्यासोबत महिला होती. परंतु, ती महिला दोन दिवसांनंतर कोणालाही दिसली नाही. त्यानंतर ओमप्रकाश याची पत्नी व मुलगा गावी आले होते. धानाची रोवणी करून पुन्हा नागपूरला गेले.

या माहितीवरून ओमप्रकाश खोब्रागडे हा इंदिरामाता, नगर नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, नीलेश भिलावे, परि. पोलिस उपनिरीक्षक सुमित्रा साखरकर, हवालदार सत्यराव हेमणे, संतोष चव्हाण, राठोड यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन नागपूर येथील पोलिस कर्मचाऱ्यांसह इंदिरामातानगर, नागपूर येथे गेले. तेथे प्रकाश खोब्रागडे हा घरी हजर आढळला. त्याच्याकडे विचारपूस केली असता मृत महिला सरस्वती चित्रासेन बिसेना, (वय ३५, रा. पोलिसनगर, नागपूर मूळ गाव चिखली, मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले.

तिच्यासोबत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, आता मुली मोठ्या झाल्याने मला तिच्यापासून दूर जायचे होते. त्यामुळे तिला १८ जुलैला चन्नेवाडा येथे मोटार सायकलवर घेऊ गेला. दोन दिवस घरी राहिला व २० जुलैला मंगळवारी पहाटे चन्नेवाडा जंगल परिसरात नेऊन काठीने मारले. ती खाली पडल्यावर तिची गळा दाबून ठार केले व तलावामध्ये टाकून घरी निघून गेला, असे सांगितले.

(Murder-News-The-murder-of-by-strangulation-Bhandara-District-News-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.