अमरावती : दुचाकी विक्रीचा व्यवसाय फिसकटल्यामुळे मित्रानेच मित्राचा चाकूने वार करून दगडाने ठेचून खून केला. तब्बल वीस दिवसानंतर विक्रम उर्फ विक्की गायकी (वय २८, रा. धनोडी) याच्या खुनाचे रहस्य उलगडले. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी दोघांना अटक केली. विनोद उर्फ गोलू सुरेश युवनाते (वय २०) व प्रवीण हिराजी सलामे (वय २० दोघेही रा. रवाळा) असे खूनप्रकरणात अटक युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्कीचा मृतदेह पट्टन ते सोनगड मार्गावरील जंगलात पुलाच्या पाईपमध्ये लपविला होता. २७ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेऊन काही दिवसानंतर हे प्रकरण शेंदुरजनाघाट पोलिसांच्या सुपूर्द केले.
शेंदुजनाघाटमध्ये मंगळवारी (ता. २२) अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी रवाळा गावात चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे बघून पोलिसांनी विनोद युवनाते याला ताब्यात घेतले. चौकशीअंती विनोदने विक्की गायकीच्या खुनाची कबुली दिली. असे पोलिस निरीक्षक मयुर गेडाम यांनी सांगितले.
२४ जुलैला रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी विक्कीची दुचाकी घेण्याचा व्यवहार युवनाते याने केला होता. त्यांचा व्यवहार फिसकटल्याने वाद झाला. घटनेच्या दिवशी विनोदने विक्रमला बोलावून, नजीकच्या गावाला नेऊन सोडून देण्याची विनंती केली. विक्रमने विनोदला दुचाकीने सातनूर येथील कच्च्या रस्त्याने गेले. घरून निघत असताना युवनातेने सोबत चाकू घेतला होता.
निर्जनस्थळ बघून रात्री नऊच्या सुमारास विक्कीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याचे डोके दगडाने ठेचून ठार केले. त्यानंतर युवनाते याने गावातील प्रवीण सलामे याला घरून एक शाल घेऊन घटनास्थळी बोलविले. त्याच शालमध्ये विक्की गायकीचा मृतदेह गुंडाळून दोघांनी मध्यप्रदेशातील पट्टन ते सोनगड मार्गावर जंगलात नेऊन नाल्याच्या पाइपमध्ये लपविल्याची कबुली अटकेनंतर युवनातेने पोलिसांपुढे दिली. खुनानंतर विक्रमची दुचाकी युवनाते याने मध्यप्रदेशात राहणाऱ्या चुलत भावाच्या घरी लपविली होती.
गायकीला केला होता कॉल
घटनेच्या दिवशी युवनाते याने गायकीला कॉल केला होता. तो विक्रमच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल ठरला. त्याआधारे पोलिस निष्कर्षापर्यंत पोहोचले.
- मयुर गेडाम,
पोलिस निरीक्षक, शेंदुरजनाघाट
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.