पत्नीचे दुसऱ्या युवकाशी संबंध असल्याचा संशय, यथेच्च मद्यपान करून केले हे...

Murder of the youth was due to an immoral relationship
Murder of the youth was due to an immoral relationship
Updated on

अल्लीपूर (जि. वर्धा) : वसंता उर्फ भीमराव आत्राम याला सात ते आठ वर्षांपासून एका युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. याच वादातून युवक कुटुंबासह दुसऱ्या गावी राहायला गेला होता. मात्र, तो कामानिमित्त गावात ये-जा करीत होता. त्याच्या गेम करण्याच्या तयारीत असलेल्या वसंताच्या हाती तो काही केल्या येत नव्हता. मात्र, 25 एप्रिल 2020 याला अपवाद ठरले... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लीपूर येथे 25 एप्रिल 2020 रोजी हमीद पठाण याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची गावात जोरदार चर्चा होती. शिवाय हमीदचा मृतदेह संशय असलेल्या महिलेच्या घराच्या लगतच आढळल्याने ही हत्या चर्चेत असलेल्या अनैतिक संबंधातून झाल्याच्या कारणाला दुजोरी देणारी ठरत होती. परंतु, आरोपी फरार असल्याने हत्येचे मुख्य कारण समोर येत नव्हते. पोलिसांनी आरोपीला अटक करताच हे हत्याकांड अनैतिक संबंधाच्या संशयातूनच झाल्याचे पुढे आले. 

येथील यशवंत शाळेच्या मागही बाजूस एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृतदेह आढळला. प्रारंभी अनोळखी असलेल्या मृताची ओळख पाटविण्यास पोलिसांना यश आले. मृतदेह हमीद पठाण याचा असल्याचे कळताच पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. 

हमीद पठाण हा मूळचा अल्लीपूर येथील असून, गत काही दिवसांपासून तो पत्नीसह समुद्रपूर येथे वास्तव्यास आहे. असे असले तरी तो अल्लीपूर येथे त्याच्या भावाकडे नेहमी यायचा. असाच तो 25 एप्रिलला आला होता. तो गावात आल्याची माहिती वसंताला मिळाली. माहिती मिळताच त्याच्या मागावर जाऊन रात्री संपविले, अशी कबुली आरोपी वसंताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक योगेश कामाले, सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिंटू पिसे करीत आहेत. 

मारण्यापूर्वी यथेच्च मद्यपान

हमीदचा खून करण्यापूर्वी वसंताने गावातील मद्यविक्रेत्याकडून यथेच्च मद्यपान केले. येथून घरी आल्यावर पहिले पत्नीला मारहाण केली. यानंतर तो घराच्या बाहेर पडला. नशेत असताना त्याच्या नजरेत हमीद आला आणि येथेच त्याचा खात्मा केला. 

दगडाने नाही दांड्याने केला प्रहार

हमीदची हत्या दगडाने दगडाने ठेचून केल्याचे दिसत होते. परंतु, आरोपीने ही हत्या दगडाने नाही तर लाकडी दांड्याने मारून केल्याचे पुढे आले आहे. तो दांडा पोलिसांनी जप्त केला आहे.

पवनी येथे शेतात होता लपून

हत्या केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळाहून पसार झाला होता. पोलिसांकडून प्रारंभी संशयावरून त्याचा पाठलाग करण्यात आला. यावेळी तो गावालगतच्या पवनी येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. 

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

आरोपीची हत्या झाली त्यावेळी आरोपीने केलेल्या हल्ल्यात नेमका कुठे मार बसला याची माहिती मिळण्यासाठी शवविच्छेदन अहवाल येण्याची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हा अहवाल केव्हा येतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.