मूर्तिजापूर - हिंदूंचे विभाजन टाळा, तरच हिंदू सुरक्षीत असतील, असा घणाघात योगी आदीत्यनाथ यांनी आज येथे केला. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजीत सभेत ते बोलत होते..विधानसभेच्या या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुती, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रूपाने महाअनाडी गठबंधन समोरासमोर आहेत. महाअनाडी नावाच्या या आघाडीस देशाची, धर्माची किंवा राष्ट्रभावनेची कदर नाही. त्यांना सामाजिक मूल्ये आणि आदर्शांची चिंता नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.छत्रपती शिवरायांनी आग्र्यास जाऊन विदेशी आक्रमक औरंगजेबास आव्हान दिले, त्यांचा तो संघर्ष आठवा, असे आवाहन करून योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीच्या लांगूलचालनी धोरणावर कडाडून टीका केली..पिंपळेंकडून योगींचा नामोल्लेख चुकीचामहायुतीचे उमेदवार हरिष पिंपळे यांनी प्रास्ताविकातून भाजप नेते तथा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा नामोल्लेख चुकीचा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्टेजवरील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या..माझं सगळं झालं, आता तुमचा विकास!गत पंधरा वर्षात माझ्यासाठी व कुटूंबासाठी जे पाहिजे होतं, ते सगळं मिळालं. आता पुढील काळात भाजप कार्यकर्त्याचा विकास होईल असे पिंपळे म्हणाले. या वक्तव्याचे निवडणूकीच्या प्रचारात काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.