गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : खेड्यातील निवडणुका म्हटल्या की लईच भारी... नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) याहून वेगळी स्थिती नाही. होम मिनीस्टरला प्रभागाच्या सत्तेची चाबी मिळावी यासाठी गोंडपिपरीत (Gondpipri taluka) प्रचंड रणशिंग फुंकली जाताहेत. सर्वसाधारण महिला गटात मोडणाऱ्या गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सख्या जावा आमनेसामने आहेत. दोघांनीही विजयासाठी कंबर कसली आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यामुळे ओबीसी आरक्षण होते तिथे सर्वसाधारण गटातून निवडणुका होताहेत. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुका १८ जानेवारीला होणार आहे. तीन प्रभागात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये दोन सर्वसाधारण महिलांसाठी तर एक जागा पुरुष प्रवर्गासाठी आहे. तिन्ही प्रभागात विजयासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे.
प्रभाग क्रं. १५ या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलीमा दामोधर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार या उभ्या आहेत. विशेष म्हणजे या सख्या जावा आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव गरपल्लीवार हे तत्कालीन पंचायत समितीचे सभापती होते. त्यांचे दोन्ही चिरंजीव हे राजकारणात आहेत. दामोधर गरपल्लीवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आहेत तर खेमचंद गरपल्लीवार हे अपक्षाची भूमिका बजावित आहे.
पत्नीला काँग्रेसची तिकीट मिळावी यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु, ते शक्य झाले नाही. यानंतर सोशल मिडियातून भाजपच्या कमळाचे सिंबाल टाकता त्यांनी शुभेच्छासंदेश टाकला व भाजपशी जुळण्याचा प्रयत्न केला. यातही खेमदेव यांना यश मिळाले नाही. शेवटी पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले. याच प्रभागातून काँग्रेसचे रामचंद्र कुरवटकर यांच्या पत्नी सुनीता कुरवटकर, भाजपकडून शुभांगी मनोज वनकर तर शिवसेनेकडून सोनाली सुरेंद्र मांदांडे या उभ्या आहेत. एकाच या प्रभागात सख्या जावा आमनेसामने असल्याने रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे.
व्यापारी मैदानात
गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat Election) मैदानात मोठ्या प्रमाणावर व्यापारी नशीब आजमावीत आहे. एचपी गॅसच्या संचालिका सविता महेंद्रसिंह चंदेल या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रं. सहामध्ये उभ्या आहेत. सचिन चिंतांवार हे किराणा दुकानदार यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ११ मधून उभे आहे. साई मशिनरीचे संचालक अजय माडूरवार यांच्या पत्नी सारिका माडूरवार प्रभाग क्र. सहामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच प्रभागातून भाजयुमोचे कार्यकर्ते तथा स्टिल भंडार दुकानदार स्वप्निल माडूरवार याच्या पत्नी प्रांजली बोनगिरवार या रिंगणात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.