नागपूर : ‘मच गया शोर सारे नगरी रे...’ इतवारीतील बालगोपालांची दहीहंडी झाली पाच लाखांची

संजय खुळे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ३८ वर्षांपूर्वी केवळ मौज म्हणून दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून नित्यनेमानेही दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते.
dahihnadi
dahihnadisakal
Updated on
Summary

संजय खुळे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ३८ वर्षांपूर्वी केवळ मौज म्हणून दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून नित्यनेमानेही दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते.

नागपूर - मेहनत इतनी खमोशी से करो की, कामयाबी शोर मचा दे... असं नवं तत्वज्ञान अलीकडे मांडले जात आहे. असाच काहीसा हंगामा इतरवारीतील काही बालकांनी हौसेखातर सुरू केलेल्या दहीहंडी स्पर्धेचा झाला आहे. आज शहरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील गोविंदा पथकांचे लक्ष इतवारीतील दहीहडी उत्सवाकडे लागले असते.

संजय खुळे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ३८ वर्षांपूर्वी केवळ मौज म्हणून दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून नित्यनेमानेही दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते. प्लेग आणि मध्यंतरी कोरोनाचा अपवाद वगळता एकही वर्ष यात खंड पडलेला नाही. इतवारी परिसर असल्याने अनेक व्यापारी यात सहभागी होऊ लागले. त्यामुळे कोरोनापूर्वी ही दहीहांडी ५ लाखांची झाली होती.

यावेळी मंडळाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने दोन लाख २२२ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. बक्षिसाची सर्वाधिक रक्कम असल्याने सर्व स्पर्धकांची याच दहीहांडीकडे धाव असते. एकापेक्षा एक सरस पथके यात उतरतात. त्यामुळे येथील दहीहंडी स्पर्धेचे सर्वांनाच आकर्षण असते. अलीकडे गोपाळांसोबतच मंडळाच्यावतीने गोपिकांसाठीसुद्धा दहीहंडी भरवणे सुरू केले आहे.

बक्षिसांची लयलुट होणार

स्‍व.राकेश गुप्‍ता व स्‍व.विवेक मोटघरे यांच्‍या स्‍मृती प्रतीत्‍यर्थ गोविंदा महिला व पुरुषांची दहिहांडी स्‍पर्धा गुरुवारी (ता. १८) आयोजित केली आहे. दुपारी दोन वाजतापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत सराफा बाजारातील स्‍व.माधवरावजी खुळे चौक, टांगा स्टॅन्ड येथे दहीहंडीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावर्षी पुरुष दहीहांडी स्‍पर्धेचे बक्षीस दोन लाख २२ हजार २२२ रुपये व स्‍मृतिचिन्‍ह तसेच महिला दहीहंडीचे बक्षीस रक्कम ५१ हजार रुपये व स्‍मृतिचिन्‍ह असे आहे.

गोपिकांवर पुष्पवृष्टी

काही वर्षांपासून इतवारा नवयुवक मंडळाने महिला गोपिकांसाठीसुद्धा स्पर्धा भरवणे सुरू केले आहे. यातही अनेक महिलांचे मंडळ सहभागी होतात. दहीहांडी फोडताना पाण्याचा मारा केला जातो. मात्र महिला गोपिकांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्याची पद्धत येथे रुजू करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()