जन्मजात अंधत्वावर मात करत 'ते' ठरले 'प्रवीण'; डिजिटल मार्गदर्शनातून मिळविले 'स्केल वन'पद

Pravin Ramteke
Pravin Ramteke
Updated on

मांजरखेड : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्मार्ट मोबाईल हा माहितीचा महाजाल आहे. पण यावर प्रभुत्व आहे ते युवापिढीचे. दृष्टिहीन व्यक्ती मात्र यापासून कोसो दूर असल्याचे आपण बघतो. प्रवीण विठ्ठलराव रामटेके या जन्मजात अंध असलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावरील मार्गदर्शनातून बँकिंग क्षेत्रात यश संपादन करीत स्केल वन पद मिळवित स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य सिद्ध केले आहे.

Pravin Ramteke
आता महागडी खेळणी घेण्याची गरज नाही! इलेक्ट्रिक टॉय, कार, बाईक रेंटवर; शुल्क केवळ...

प्रवीण रामटेके हे गटसाधन केंद्र तिवसा येथे समावेशीत विषय साधनव्यक्ती पदावर कार्यरत आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना डी. एड, बी. एड केलं. यासह एमएची पदवी संपादन केली.

अमरावती येथील डॉ. भिवापूरकर विद्यालयात शिकताना अनेक कला हस्तगत करून चार पैशाचे अर्थाजन केले. परंतु जगण्यासाठी हे पैसे पुरेसे नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे मोर्चा वळविला. २००६ मध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कंत्राटी स्वरूपाची नोकरी स्वीकारत कुटुंबाची उदरनिर्वाहाची व्यवस्था केली.

Pravin Ramteke
Ajit Pawar : 'अजित पवार शांत बसणार नाहीत, दिवाळीपर्यंत ते आमदारांची जमवाजमव करतील', आणखी एक गौप्यस्फोट

कधी काळी टेपरेकॉर्डरवर कॅसेट रेकॉर्ड करून अभ्यास करणारे प्रवीण रामटेके आज स्मार्ट मोबाईलचा आधार घेत आहे. वोक्यालायझर व्हॉइस, इटीलोंस टीटीएससारख्या ॲनड्रॉइड अ‍ॅपमुळे ते मोबाईल सहज हाताळत आहेत.

सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्रामवर, यूट्यूब आदी अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांचे खाते असून अद्ययावत माहितीसाठी ते त्यांचा नियमित वापर करतात. कार्यालयीन काम करण्यासाठी व्हॉइस माध्यमातून वर्ड, एक्सेल व विविध ऑफिशियल सॉफ्टवेअर ते लीलया हाताळतात. याच माध्यमातून तंत्रज्ञानाचे धडे गिरवत प्रावीण्य प्राप्त करीत आहेत.

सोशल मीडिया ठरले वरदान

यूट्यूबवरील एका चॅनल मार्गदर्शनातून प्रवीण रामटेके यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. याच अभ्यासाच्या बळावर त्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ज्युनिअर मॅनेजर स्केल वन पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.