Nagpur : ‘एक्स-रे’ फिल्मचा तिढा सुटेना, सुटेनाशासकीय दंत रुग्णालयात ३ हजार रुग्णांना फटका

शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि लागूनच असलेल्या आंध्र प्रदेशातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात.
dental hospital X-ray
dental hospital X-ray sakal
Updated on

नागपूर- दातांच्या वेदनांमुळे शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना एक्स रे फिल्म तुटवड्याने डोकेदुखी सहन करावी लागत आहे. शासकीय दंत रुग्णालयात एक्स-रे फिल्मचा तुटवडा असताना १५ ते २० दिवसांपासून रुग्णांना खासगीचा रस्ता धरावा लागतो. याचा ३ हजार रुग्णांना आर्थिक फटका बसला आहे. एक्स रे फिल्मचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि लागूनच असलेल्या आंध्र प्रदेशातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात.

‘एक्स-रे’ फिल्मचा तिढा सुटेना

खासगीच्या तुलनेत येथे स्वस्त उपचार मिळतात. त्यामुळे रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नेहमीच गर्दी असते. दात, दाढ अथवा हिरड्यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णाला नेमके काय झाले, हे तपासण्यासाठी ‘एक्स-रे’ काढला जातो. त्यानंतरच उपचाराची दिशा ठरते. या रुग्णालयातील एक्स-रे फिल्म १५ ते २० दिवसांपासून संपल्याने बाह्यरुग्ण विभागात रुग्णांना खासगीतून एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला जात आहे. दररोज दंत रुग्णालयात दीडशेवर रुग्णांच्या दातांचा एक्स रे काढतात. अशा सुमारे तीन हजार रुग्णांना फिल्म तुटवड्याचा फटका बसला आहे.

एक कोटी देऊनही हाफकिनचे हात वर

शासकीय दंत महाविद्यालयात अल्पदरात एक्स-रे मिळतो, त्याच एक्स-रेसाठी रुग्णांना खासगी केंद्रात ४०० रुपये खर्च करावे लागतात. चार वर्षांपासून सुमारे १ कोटीचा निधी शासकीय दंत महाविद्यालयाकडून हाफकिनकडे वळता करण्यात आला आहे, मात्र एक एक्स रे फिल्मसुद्धा हाफकिनतर्फे पुरवठा झाला नाही.

यामुळेच दंत रुग्णालयात एक्स रे फिल्मचा तुटवडा पसरला आहे. विशेष असे की, हाफकिनकडून पुरवठा होत नसल्याने राज्य शासनाने जीएम पोर्टलवरून खरेदी करण्याचा प्रयत्न शासकीय दंत रुग्णालय प्रशासनाने केला. मात्र दरात मोठी तफावत असल्याने तसेच खरेदीसाठी खुप उशीर होत असल्याने स्थानिक पातळीवर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

एक्स-रे फिल्मच्या तुटवड्यासंदर्भात माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा हलविण्यात आली. फिल्म संपण्यापूर्वी स्टॉक मागविण्यात येतो. मात्र जीएम पोर्टल की, स्थानिक पातळीवरील खरेदी प्रक्रियेमुळे थोडा उशीर झाला. येत्या तीन चार दिवसांत एक्स रे फिल्म येतील.

-डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता,

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.