Nagpur : पोळा सणावर यंदाही महागाईचे सावट ३० टक्के भाववाढ,बाजार साहित्य खरेदीसाठी गर्दी कमी

बैलपोळ्याच्या सणानिमित्त सर्जा-राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
nagpur
nagpur sakal
Updated on

नागपूर - पोळा हा बळीराजासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण. पण अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या या सणावर यंदा महागाईचे सावट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्यामुळे बैलांच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. बाजारात पोळ्यासाठी साहित्य विकणाऱ्यांची गर्दीही कमी आहे.

इतवारी, सुभाषनगर आणि गांधीबाग बाजारात साहित्याची अधिकच्या दरात खरेदी करावी लागत असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा बाजारात थंड प्रतिसाद आहे.

बैलपोळ्याच्या सणानिमित्त सर्जा-राजाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

nagpur
Nagpur News : आरोपीला पोलिस ठाण्यात व्हीआयपी सेवा, बालिकेचे ४ वर्षांपासून करीत होता शोषण

साहित्यात चौरंग, मठाठी, वेसण, दोर, माळ, मोरकीचा समावेश आहे. बैल हा शेतकऱ्यांचा सोबती. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैंलांच्या रुणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते. पोळ्याच्या पहिल्या दिवशी त्यांचे खांदे तूप व हळदीने शेकले जातात. गरम पाण्याने त्यांची आंघोळ घातली जाते.

nagpur
Amravati News : आदिवासी महिलेची विहिरीत ढकलून हत्या

यंदा ऑगस्टमध्ये खंडित झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक होती. पण दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हास्य फुलले आहे. या काही वर्षांत ट्रॅक्टरचा उपयोग वाढल्यामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सणाची व्यापकताही कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

nagpur
Jalna Protest : आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याची शपथ

बैलपोळा १४ रोजी तर तान्हा पोळा १५ सप्टेंबरला येत आहे. मार्केटमध्ये तान्हा पोळ्याची धामधूम मात्र आतापासूनच दिसून येत आहे. बाजारात विविध प्रकारचे नंदी मुलांना आकर्षित करीत आहे. यंदा लाकडाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याने नंदीच्या भावातही १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

अशा आहेत वस्तूंच्या किंमती

नाथ ४० - ५० रुपये जोडी

दोर १००-१४० रुपये जोडी

मढाढी ४०-४५ रुपये जोडी

मोरके ६०, ८०, ११० रुपये जोडी

केसाळ पैजण ४० ते ५० रुपये जोडी

कवडी माळ १०० रुपये जोडी

रंगाची माळ २० ते १०० रुपये जोडी

पैजण ६० ते २०० रुपये जोडी

पेंट ५० ग्रॉम ४० रुपये

घंटी १४० ते ४०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.