बंदमुळे १० कोटींची उलाढाल ठप्प

पुतळ्याचे दहन : धान्यावरील जीएसटी विरुद्ध व्यापारी आक्रमक
10 crores turnover stopped due to ban in nagpur
10 crores turnover stopped due to ban in nagpur
Updated on

नागपूर - नॉन ब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवारी व्यापाऱ्यांनी होलसेल इतवारी धान्य बाजार, कळमना आणि दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यामुळे एकाच दिवसात १० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प झाली. धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. दरम्यान, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जीएसटीचा पुतळा जाळण्यात आला.

स्वातंत्र्यानंतर भारतात प्रथमच नॉन ब्रँडेड धान्य, डाळी तसेच इतर खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला. त्याची अंमलबजावणी १८ जुलैपासून होणार आहे. या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता.

धान्य बाजार, बाजार समिती बंद ठेवण्यासह दालमिल चालक बंदमध्ये सहभागी झाले होते. या बंदला अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ (कॅट) आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पूर्ण पाठिंबा दिला होता. या बाजारातून केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेशात येथून माल जातो. दिवसभरात येथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या बंदमुळे व्यवहार न झाल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, एनव्हीसीसीचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया, मानद सचिव रामावतार तोतला, होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, सुरेश भोजवानी, भीमसेन गर्ग यांनी बंदमध्ये सहभागी होत एकजूट दाखवून या निर्णयाचा निषेध केला. आंदोलनात उपाध्यक्ष अर्जुन आहुजा, फारुक अकबानी यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.

१५० दालमिलचे उत्पादन ठप्प

दालमिलमध्ये मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन होऊन ती देशासह विदेशातही निर्यात होत असते. १५० दालमिलच्या माध्यमातून दररोज जवळपास हजारो टन डाळींचे उत्पादन येथे होत असते. मात्र दालमिल बंद ठेवण्यात आल्याने डाळींचे उत्पादन थांबले. त्यामुळे हजारो कामगारांचा रोजगारही गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()