नागपूर : कोरोनापश्चात (post covid) बुरशीच्या आजाराची (म्युकरमायकोसिस) (mucor micosys) लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (government medical and hospital nagpur) दातांशी संबंधित ४९ बुरशीच्या (black fungus) आजाराचे रुग्ण आढळून आले. यापैकी १९ जणांच्या जबड्यावरील शस्त्रक्रिया येथील मॅक्सिलोफेसियल शल्यक्रिया विभागात झाल्या आहेत. यातील १० जणांचे जबडे (jaw surgery) काढण्यात आले आहेत. बुरशीच्या रुपाने कोरोनानंतर एक नवे संकट जनसामान्यांसमोर उभे ठाकले आहे. मात्र, लवकर निदान झाले तर संपूर्णपणे रुग्ण बरा होतो, असे जाणकार तज्ज्ञांचे मत आहे. (10 people faced jaw surgery due to mucor micosys in nagpur)
जबडा काढलेले ९ जण ठणठणीत बरे -
म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य संसर्गाने आतापर्यंत पूर्व विदर्भातील नागपूरमधील ७, तर चंद्रपूरमध्ये २ अशा ९ जणांचा बळी घेतला आहे. कोरोनानंतर कमी झालेल्या रोगप्रतिकार शक्तीवर बुरशी भारी पडत आहे. शासकीय दंत महाविद्यालयातील मॅक्सिलोफेसियल विभागात सुमारे ४९ जणांची बुरशीच्या आजारासाठी नोंदणी झाली आहे. एप्रिल महिन्यांपासून १९ जणांचा जबडा काढण्यात आला. यांतील ९ जणांच्या जबड्यावर पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रिया झाली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १० जणांच्या वरच्या आणि खालच्या जबड्यात बुरशीने शिरकाव केल्यानंतर काळजी न घेतल्याने त्यांच्या जबड्यावर शस्त्रकिया करण्यात आली. पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांवर रेमडेसिव्हिर किंवा स्टेरॉईडचा वापर कमी झाला होता. यामुळे त्यावेळी पाहिजे त्या प्रमाणात म्युकोरमायकोसीसचे रुग्ण अल्पप्रमाणात आढळले. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्या पूर्व विदर्भात ३७० जणांना म्युकोरमायकोसीसने विळख्यात घेतले. सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरातील आहेत.
मेंदूपर्यंत पोहचली बुरशी -
शासकीय दंत रुग्णालयात आढळून आलेल्या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे. एप्रिलपासून आतापर्यंत १९ जणांचे जबडे बदलण्यात आले. विशेष असे की, बुरशीचा आजार फुफ्फुसांपर्यत पोहचला असून पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीव्हीटिएस विभागात रेफर केले आहे. तर एका जणांच्या मेंदूपर्यंत बुरशीने अतिक्रमण केले. त्यांना सुपरच्या मेंदूरोग विभागात रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती मुखशल्य चिकित्सा विभागप्रमुख डॉ. अभय दातारकर यांनी दिली.
अशी आहेत लक्षणे
बुरशीचे जंतू श्वास व त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करत असले तरी कोरोना काळात उपचारादरम्यान व्हेटिलेटरची स्वच्छता न केल्याने हे जंतू थेट शरीरात प्रवेश करतात. यामुळे हिरड्यांना सुज येते. रुग्णांचा जबडा निकामी होण्याची भिती असते. तीव्र डोकेदुखी वाढते, दातांना वेदना असह्य होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.