Nagpur News : १०७ रस्त्यांवर गर्भवतीची केव्हाही प्रसुती; खड्ड्यांनी नागरिक त्रस्त

खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; पावसाळ्यात किरकोळ अपघातांची मालिका
107 nagpur road potholes rain cause accident police administration politics
107 nagpur road potholes rain cause accident police administration politicssakal
Updated on

नागपूर : शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले असले तरी अजूनही अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जवळपास १०७ डांबरी रस्त्यांची चाळणी झाल्याचे वास्तव आहे. एखाद्या गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेताना धक्क्यांमुळे तिची रस्त्यावरच मध्येच प्रसुती होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे एप्रिल ते जूनपर्यंत एक हजार खड्डे बुजविल्याचा महापालिकेच्या दाव्यातील हवाच यानिमित्त निघाली आहे. शहरात महापालिका, नासुप्र, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे एकूण ३ हजार ५४९ किमीचे रस्ते आहेत.

महापालिकेच्या डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने मेच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरू केली.

शहरात महापालिकेचे २ हजार ४०६ किमीचे रस्ते आहेत. महापालिकेने या रस्त्यांवर, त्यातही डांबरी रस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले. एप्रिल ते जून या काळात हॉटमिक्स विभागाने ९९१ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.

मागील २०२२-२३ या वर्षात हॉटमिक्स विभागाने

सहा हजारांवर खड्डे बुजविले. परंतु शहरातील विविध झोनमधील रस्त्यांची स्थिती बघता महापालिकेचा दावा पोकळ दिसून येत आहे. लक्ष्मीनगर आणि गांधीबाग या झोनमध्ये किती खड्डे बुजविले याबाबत महापालिकेकडे कुठलाही रेकॉर्ड नसल्याने खरेच खड्डे बुजविले की केवळ आकडेच पुढे केले, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

107 nagpur road potholes rain cause accident police administration politics
Nagpur News : प्रवासी संख्‍या वाढून ही वंदे भारतचा प्रवास महागच; नागपूर-बिलासपूरच्या प्रवाशांची अपेक्षा धुळीस

हॉटमिक्स विभागाच्या सूचनेनुसार केलेल्या सर्वेक्षणानुसार नेहरूनगर, लकडगंज आणि मंगळवारी झोनमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये ३२ रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

धरमपेठ झोनमध्ये १५ तर लकडगंज झोनमध्ये २४ रस्त्यांची वाईट स्थिती आहे. लकडगंज झोनमधील पारडी, कळमना येथील रस्त्यांची दुरुस्ती गतीने करण्याची गरज आहे. आशीनगर झोनमध्ये महापालिकेच्या मालकीच्या चार रस्त्यांची दुरवस्था आहे.

107 nagpur road potholes rain cause accident police administration politics
Nagpur News : गाईच्या शेणापासून साकारणार श्रीगणेशाची मूर्ती

आशीनगर झोनमधील मोठा भाग नासुप्रचा आहे. मंगळवारी झोनमध्ये १५ रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यांबाबत अनेकदा तक्रार करण्यात आल्याचे या परिसरातील नागरिक अश्विन खांडेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या दाव्यावर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकच नव्हे तर पायी चालणाऱ्यांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरून गर्भवतींना घेऊन जाताना हादरे बसून त्यांचे गर्भ घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोदकामाने नागरिक त्रस्त

विविध कामांसाठी शहरात ऐन पावसाळ्यात खोदकाम करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांवरही खोदकाम करण्यात येत आहे. एवढेच नव्हे मानेवाडा-बेसा रोड, शताब्दी चौक, रामेश्वरी रस्त्यांवर चेंबर दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांना सर्कस करावी लागत आहे.

107 nagpur road potholes rain cause accident police administration politics
Nagpur News : मुलींचा कल आयटीआयकडे; कॉम्प्युटर व बेसिक कॉस्मेटोलॉजीला प्राधान्य

पावसाळ्यापूर्वीच खोदकामाला हवा लगाम

शहरात खोदकामासाठी नियमाची गरज नागपूर सिटीझन फोरमचे अभिजित झा यांनी व्यक्त केली. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सर्व खोदकाम बंद करण्याबाबत महापालिकेने नियम करण्याच्या आवश्यकतेवर नागरिकांनी भर दिला आहे. नागपुरात जूनच्या मध्यापासून पावसाला सुरुवात होते. सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो. या पार्श्वभूमीवर जून ते सप्टेंबर रस्त्यांवर खोदकामाला लगाम लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()