Nagpur News : दहावी पास चोराने घातला अनेकांना गंडा

आठवी ते दहावी पास दोन तरुणांनी चक्क आयटी कंपनी स्थापन करीत, त्यातून अनेकांना गंडविल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिसांनी दोघांसह त्याच्या साथीदाराला मुंबईतून अटक केली.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : आठवी ते दहावी पास दोन तरुणांनी चक्क आयटी कंपनी स्थापन करीत, त्यातून अनेकांना गंडविल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिसांनी दोघांसह त्याच्या साथीदाराला मुंबईतून अटक केली.अतूल इंद्रपती सिंग (वय ३२, रा. बी विंग, ओम अपार्टमेंट, जीवदानी क्रॉस रोड, सहकार नगर, विरार पूर्व, पालघर), नीरज शामकुमार चौबे (वय २६, रा. नागरिक कॉलनी अपार्टमेंट, विरार रोड, नालासोपारा पूर्व, पालघर), विकास मेघलाल साव (वय २३, रा. लोकसेवा मंडळ, एस.व्ही. रोड, इंदिरानगर, दहीसर, मुंबई) अशी आरोपींची नावे आहे. अतूल हा दहावी शिकला असून नीरज आठवी तर विकास पदवीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. त्यांनी समर्थ आयटी सोल्यूशन नावाने कंपनी तयार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाल येथील दसरा रोड येथे राहणारे अतूल सदाशिवराव उईके (वय ४१) यांच्या मोबाइलवर फोन पे ॲप सुरू होत नसल्याने त्यांनी ७ मे रोजी गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्यांना तो मिळताच, त्यावर फोन करून फोन पे बंद असल्याची माहिती दिली. मात्र, या क्रमांकवरून त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगण्यात आले. त्यांनी व्हिडीओ कॉल केला असता, त्यांना सायबर चोरट्याने मोबाइल सेटिंग करून घेत, रात्री साडेअकरा ला फोन पे ॲप सुरू होईल अशी माहिती दिली.

त्यानंतर रात्री पावणे अकरा वाजता त्यांच्या फोनमधून १ लाख ४९ हजार, दुसऱ्या दिवशी एक लाख ९९ हजार आणि एक लाख ४९ हजार असा पाच लाख त्यांच्या खात्यातून वळते करण्यात आले. ही बाब लक्षात येताच, त्यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीदास मडावी यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक मारोती शेळके, विजय भिसे, सहायक फौजदार दत्ता निनावे, हवालदार गजानन मोरे, चंद्रशेखर दडमल, पराग जवादे, बबलु ठाकुर, सुशील चंगोल, रोहित मटाले यांनी सुरू केला.

Nagpur News
Nagpur Weather Update : पहाटे पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण; नागपूर जिल्ह्यात आणखी दोन दिवस यलो अलर्ट

पंधरा दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर सायबर पोलिसांनी आरोपींचा शोध लावून मुंबईतून आरोपींना अटक केली. त्यांच्या खात्यातील एक लाख रुपये गोठविण्यात आले असून त्यांची रविवारपर्यंत पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

दररोज करायचे मोबाईल, सीममध्ये बदल

आठवी आणि दहावी पास असलेले सायबर चोरटे अतिशय हुशार असल्याने त्यांनी आयटी कंपनीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली. एकावेळी फसवणूक केल्यावर ते आपला मोबाइल आणि सीम फेकून द्यायचे. त्यामुळे त्यांचे लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांना दमछाक करावी लागली. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे एक नियमित क्रमांक होता. तो त्यांनी कुणालाही दिलेला नव्हता. हा क्रमांक हुडकून काढत त्यांना मुंबईतून शिफातीने अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.