नागपूर - कोलकता आणि बदलापूरच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रकरणातून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारनेही पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातून शहरातील स्मार्ट सिटी प्राधीकरण आणि शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने उपाययोजना म्हणून शहरातील सीसीटीव्हीचे नेटवर्क वाढवित ११०० नवे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची योजना आखली आहेत. महिलांच्या असुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’वर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहे.