नागपूर : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची मृत्युसंख्या (corona death toll nagpur) आता ८ हजार ३२५ एवढी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of corona) जिल्ह्यातील मृत्यूदर प्रचंड वाढला होता. कोरोना (coronavirus) झाल्याचा संशयाने चाचण्या करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. यामुळे कोरोना चाचणीचा (corona testing) अहवाल येण्यास उशीर होऊ लागला. यामुळे उपचारालाही उशीर होत असल्याने कोरोनाची दुसरी लाट पेलवू न शकल्याने खाटांसाठी धावाधाव सुरू झाली. मात्र, उपचारासाठी मेयो (IGGMC), मेडिकलमध्ये (nagpur GMC) दाखल करण्यापूर्वीच १ हजार १२२ कोरोनाबाधितांना जीव गमवावा लागला. मृतावस्थेताच मेडिकल-मेयोत त्यांना दाखल करण्यासाठी आणले. दुर्दैवाने रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांच्यावर कोरोनाने झडप घातली. त्यामुळे या बाधिकांची ब्रॉड डेथ कोविड पॉझिटिव्ह अशी नोंद करण्यात आली. (1122 corona positive patients died before treatment till date in nagpur)
कोरोना विषाणूने जिल्ह्यात पाय ठेवल्यापासून आतापर्यंत ४ लाख ५६ हजारावर कोरोना बाधितांची नोंद घेतली गेली. त्यातील ४ लाख ४ हजारांपेक्षा अधिक बाधित रुग्ण उपचाराने ठणठणीत बरे होऊन घरी परतले. मात्र, जिल्ह्यात उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी १० हजार १८ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र, यापैकी ८०५ कोरोनाबाधित मृत्यू पावले, तर मेयो रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल झाल्यानंतर १०हजार ६५० कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले. मात्र यादरम्यान २ हजार ८८६ जीव कोरोनाने घेतले आहेत. मात्र, कोरोनाचा संशय आल्यानंतर चाचणीला उशीर झाल्यामुळे किंवा घरीच उपचार करण्याची चुक भोवल्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी १ हजार १२२ कोरोनाबाधितांचे रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाले. यांना कोरोनावरील उपचार घेताच आले नाही.
जिल्ह्याबाहेरच्या मृत्यूने वाढला नागपूरचा मृत्यूदर -
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध जिल्ह्यातून मेयो, मेडिकल तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले. वर्षभरात सुमारे १ हजार ३८४ कोरोनाबाधितांना रेफर करण्यात आले. यापैकी १ हजार २०२ जणांचा मृत्यू झाला. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा टक्का नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामुळेच नागपूर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यूचा टक्का वाढला असल्याचे दिसून येते.
मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत (ब्रॉड डेथ)आलेले बाधित : ४५५
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत (ब्रॉड डेथ) आलेले बाधित : ६६७
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.