नागपूर : कोवळ्या वयातील दात दुधाचे असतात. ते दात कोवळे असतात. मात्र चिमुलांच्या दंत आरोग्याकडे सारेजण दुर्लक्ष करतात. त्यातच अलीकडे मुलांना जंकफुड पासून तर चॉकलेटचे आकर्षण असते.
परिणामी नियमितपणे दात स्वच्छ न केल्याने शाळकरी मुलांमध्ये दातांच्या आजाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे निरीक्षण दंतरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यातच पिट ॲण्ड फिशर सिलेंट हा आजार मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज आहे.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाल दंत चिकित्सा विभागाने नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ फ्लोरोसिसहा प्रकल्प राबवून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १७ शाळांमधील मुलांच्या दातांची तपासणी केली.
यात १ हजार १३८ मुलांच्या १ हजार८९४ दातांना कीड लागल्याचे वास्तव समोर आहे. आरोग्य विभागाकडून झालेल्या प्राथमिक तपासणीनंतर दातांना कीड लागलेल्या या मुलांवर खड्डा आणि फिशर सिलंट प्रक्रियेद्वारे उपचार करण्याचे काम शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील बाल दंतरोग चिकित्सकांनी केले.
या प्रकारात संबंधित मुलांच्या दातांवर रेशासारख्या फटी होऊन तेथे चिकट अन्न चिकटते. ते मग सडून तेथे ॲसिड तयार होऊन संबंधित मुलांमध्ये दाताच्या विविध समस्यांसह पचनास त्राससह इतरही समस्या उद्भवतात. स्वच्छतेअभावी ही समस्या निर्माण होते. कुजलेल्या ठिकाणी ब्रश पोहोचू न शकल्याने समस्या वाढतात.
कुजलेला भाग पिट ॲण्ड फिशर सिलंट पद्धतीने पॅक केला जातो. अशा प्रकारे यावर टाळण्यासाठी उपचार केले जातात. पिट आणि फिशर सिलंट पद्धतीने जीआयसी, कंपोझिट, स्केलिंग, अल्जिनेट इंप्रेशन, एक्स्ट्रॅक्शन, ब्लिचिंग, रूट कॅनल इ. यामध्ये बहुतांश रुग्णांना संमिश्र उपचार घ्यावे लागले. दात नियमित न साफ केल्याने दातांचा अंतर्गत आकार वाकडा होऊन दात किडण्याची समस्या निर्माण होते.
२०२२-२३ - १० शाळांमधील तपासणीत ७५६ मुलांवर खड्डा आणि फिशर सिलंट पद्धतीने उपचार
२०२३-२४ - ७ शाळांमधील ३९६ मुलांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले.
चालु वर्षात ११३८ मुलांचे दात किडलेले आढळले. या मुलांच्या दातांना छिद्रे होती.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामार्फत दरवर्षी शाळकरी मुलांवर उपचार केले जातात. त्यासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी शाळांमध्ये जाऊन मुलांचे दात तपासतात. तपासादरम्यान, त्यांच्या आजारांचा तपशील गोळा केला जातो.
हा तपशील संबंधित शाळा आणि पालकांना दिला जातो. यापैकी ज्या बालकांचे दात किडलेले आहेत किंवा त्यांना छिद्रे आहेत, त्यांची माहिती बालरोग दंतचिकित्सा विभागाची चमू पालकांना देऊन त्यांचे समुपदेशन करते. त्यानंतर गावांत जाऊन मुलांवर उपचार केले जातात.
जंकफुड, चॉकलेटचे अतिसेवन यासाठी जोखमीचे आहे. दिवसातून दोन वेळा ब्रश न करणाऱ्या मुलांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येते. घरातील मुल पहिल्या वर्षाचा होण्यापूर्वीपासून त्याला दंतरोग तज्ज्ञाला दाखवायला हवे. मुलांना योग्य पद्धतीने दात कसे घासावे याचे समुपदेशन करण्यात यावे. तसेच या आजाराबाबत जनजागृती करून मुलांवर उपचारासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-डॉ. रितेश कळसकर, विभागप्रमुख, बाल दंतरोग विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.