Nagpur Cyber Crime : सायबर क्राईम विभागातून बोलत असल्याचे सांगून खात्यातून काढले १३ लाख

मुंबई येथील सायबर क्राईम विभागातून बोलत असून तुमच्या खात्यातून अनधिकृतपणे वीस कोटी रुपयाचा व्यवहार झाला असल्याची बतावणी करून खासगी व्यावसायिकाची १३ लाख रुपयाने फसवणूक केली.
cyber crime
cyber crimeSakal
Updated on

नागपूर - मुंबई येथील सायबर क्राईम विभागातून बोलत असून तुमच्या खात्यातून अनधिकृतपणे वीस कोटी रुपयाचा व्यवहार झाला असल्याची बतावणी करून खासगी व्यावसायिकाची १३ लाख रुपयाने फसवणूक केली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी एनॉन मॅथ्युशिल प्यारेजी (वय ३९, रा. न्यु कॉलनी पोस्ट ऑफीस, गोंडपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.