सावधान...आता बुरशीची बारी! १५० पेक्षा जास्त रुग्ण; आठ जणांनी गमावली दृष्टी

बुरशीजन्य आजार
बुरशीजन्य आजारe sakal
Updated on

नागपूर : कोरोनाविषाणू (coronavirus) अद्याप आटोक्यात आलेला नाही. त्यातच म्युकोरमायकोसीसने (बुरशीजन्य संसर्ग) (mucormycosis) धडकी भरवायला सुरुवात केली आहे. उपराजधानीत विविध रुग्णालयांमध्ये आतापर्यंत या बुरशीजन्य आजाराचे १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून सुमारे आठ जणांची कायमची दृष्टी (vision loss) गेली आहे, तर अनेकांचे दात व जबडाच काढल्याची माहिती दंतचिकित्सकांनी (dentist) दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये हा आजार दिसून येत असल्याने प्रशासनासमोर या बुरशीच्या रुपाने नवीन संकट उभे ठाकणार आहे. (150 mucormycosis patients found in nagpur)

बुरशीजन्य आजार
श्रीनिवास रेड्डीची उच्च न्यायालयात धाव; राज्य शासनाला नोटीस

अशी आहेत लक्षणे -

म्युकोरमायकोसीस एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या आजारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. या बुरशीचे रोगजंतू श्वास व त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. रुग्णांचा जबडा, हिरड्यांना सूज येते, डोकेदुखी वाढते, दातना तीव्र वेदना होतात. ताप भरल्यासारखे वाटते. वरच्या आणि खालच्या जबड्यात ही बुरशी शिरकाव करते. काळजी घेतली नाही तर जबडा बदलावा लागतो. काही वेळा अंधत्वही येवू शकते.

दुसऱ्या लाटेनंतर लक्षणीय वाढ -

म्युकोरमायकोसीस हा तसा जुनाच आजार आहे. परंतु, आधी तो अभावानेच आढळायचा. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर जे कोरोनामुक्त झाले व ज्यांना साखरेचा त्रास आहे त्यांना या बुरशीच्या संसर्गाचा त्रास जाणवत आहे. मात्र, वेळेत उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बुरशीजन्य आजार
डॉक्टर मुलीने फोनवर केले मार्गदर्शन अन् अख्खं कुटुंब झाले कोरोनामुक्त

चिंता वाढली -

शहरात म्युकोरमायकोसीसचे रोज चार ते पाच पेशंट आढळून येत आहेत. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, दंतवैद्य आदी डॉक्टर व संशोधक या फंगल इन्फेक्शनमध्ये अचानक होणाऱ्या वाढीबद्दल चिंतित आहेत.

स्टेरॉइड्सचा जास्त वापर केल्यामुळे बुरशीजन्य आजारास रुग्णाच्या शरीरात सक्रिय होण्यास परवानगी मिळते. म्युकोरमायकोसीस हे कोविड संसर्गकाळात आव्हान आहे.
-डॅा. अभय दातारकर, विभाग प्रमुख, शासकीय दंत महाविद्यालय
शासकीय दंत रुग्णालय आणि विविध रुग्णालयांमध्ये या बुरशीजन्य संसर्ग असलेल्या रुग्णांवर ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यात किमान आठ रुग्णांनी आयुष्यभरासाठी दृष्टी गमावली आहे.
- डॉ सुचित्रा गोसावी, प्राध्यापक व विभाग प्रमुख
दंतचिकित्सकांना कोविडच्या काही रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसीस अचानक वाढताना दिसत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये स्टेरॉइडचा अतिवापर या संसर्गास कारणीभूत ठरत आहे.
-डॉ. वैभव कारेमोरे, सहयोगी प्राध्यापक
  • तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेवून उपचार आवश्यक

  • स्टेरॉईडसह इतर इंजेक्शनचा अतिवापर टाळावा

  • तज्ज्ञांनी सुचविलेल्या माउथवॉशने गार्गलिंग

  • गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे

  • एकूण रुग्ण -१०२

  • यशस्वी उपचार -४५

  • (शासकीय दंत रूग्णालय, नागपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.