नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५६ उमेदवारांना निवडायचे आहेत, मात्र इच्छुकांची संख्या पंधराशेच्या घरात असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच काँग्रेसला पडला आहे. महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेससमोर कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न आहे.
गटबाजीमुळे मागील निवडणुकीत मोठ्या पराभवाला काँग्रेसला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे अद्याप संपलेली नाहीत. ठाकरे आणि राऊत गटाची तोंडे अद्यापही वेगवेगळ्या दिशेलाच आहेत. राज्यात सत्ता आल्यानंतर भांडणे कमी होतील आणि काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र कुरघोडी आणि आपआपल्या समर्थकांनाच सर्व काही देण्याच्या नेत्यांच्या अट्टाहासामुळे परिस्थिती आणखीच बिघडली आहे.
एक व्यक्ती एक पदाच्या निर्णयामुळे विकास ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र पुन्हा त्यांनाच अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचे पत्र काँग्रेसने दिले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक आणखीच नाराज झाले आहेत. मध्यंतरी प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीवरूनही असंतोष उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शहाध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी उमेदवारी वाटपावर तोडगा काढला. त्याकरिता आपणच आपल्या प्रभागातील उमेदवार एकमताने ठरवावा अशी सूचना त्यांनी केली. आगामी निवडणुकीत १५ जणांचे मंडळ करावे. एक बुथ अध्यक्ष व १५ बुथचा एक वार्ड तयार करावा.
शहरातील निरीक्षक म्हणून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर वार्ड अध्यक्षाची निवड करावी. येत्या काही दिवसामध्ये डिजिटल मेंबरशिप करण्यात आली होती. १८ ब्लाॅकवर १८ बी.आर.ओ यांनी कार्य केले. त्यानुसार काही नवीन ब्लॉक अध्यक्ष व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी नव्याने संघटनेत दिसतील. लवकरच बीआरओ प्रदेश काँग्रेसला प्रस्ताव सादर करतील. प्रदेश काॅग्रेस कमेटीकडून नवीन कार्यकारिणी घोषित होईल, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.