अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा
Updated on

नागपूर : कोरोना संसर्ग (Corona) काळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्यासाठी वायुदल (IAF) व रेल्वेच्या मदतीने ओडिशा राज्यातून चार टॅंकर ५६.३ मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन शहरात पोहचले आहेत. तसेच भिलाई (Bhilai) येथूनही ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शनिवारी शहराला एकूण १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. आनंद देणारी आणखी एक बातमी म्हणजे आज आणखी चार टँकर रेल्वेने येण्याची अपेक्षा आहे. (169 metric ton oxygen provided to Nagpur)

अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा
वय ८० वर्ष, HRTC स्कोर २० तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आजींची कोरोनावर मात

आज ५८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा झाला आहे. दोन दिवसापूर्वी वायुदलाच्या विशेष विमानाने चार टँकर ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर नजीकच्या अंगूल येथील स्टील प्लांटसाठी रवाना करण्यात आले होते. ७ मे च्या पहाटे ४.०५ वाजता दुसऱ्या ‘ऑक्सिजन ट्रेन’ ने नागपूर स्टेशनच्या फलाट क्रमांक ८ हे चारही टँकर पोहचले.

भिलाई येथून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व्यतिरिक्त हा ऑक्सिजन नागपूर शहराला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शनिवारी भिलाई व अंगूल येथून एकूण १६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला ६२ मेट्रिक टन व मेडिकल व अन्य रुग्णालयांना ७१ मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले आहे.

३ हजार ८६७ रेमडेसिव्हिर प्राप्त

नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाला शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिव्हिर प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे. तथापि, हॉस्पिटलकडून होणारी मागणी आणि होणारा पुरवठा अत्यंत कमी असून यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.

अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा
लस आली हो! ४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

२९ हजार लसीची खेप आली

जिल्ह्यामध्ये शुक्रवारी उशिरा २९ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामधील १४ हजार ५०० शहर व १४ हजार ५०० ग्रामीण भागात वितरण करण्यात आल्या असून या उपलब्ध लसीतून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या लसीची देखील मागणी नोंदविली आहे.

(169 metric ton oxygen provided to Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()